नांदगाव – नांदगाव रेल्वे स्थानकावर एका माथेफिरू तरुणाने आरपीएफ अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात रेल्वे सुरक्षा अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मालेगावच्या खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहे. डी.के तिवारी असे या अधिकाऱ्याचे आहे नाव आहे. या अधिका-यावर हल्ला करणा-या माथेफिरुचे नाव सोकेश लीलाधर तिडके हे आहे. या माथेफिरुन स्वतःच्या गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून घेतले. संशयास्पद तरुण रेल्वे स्थानकावर फिरत असल्याने त्याची चौकशी केली म्हणून राग आल्याने हल्ला केल्याचे बोलले जात आहे.