मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमोबाइल ब्रँडने आपल्या १००वे किया सर्टिफाईड प्री-ओन्ड (सीपीओ) आऊटलेटचे उद्घाटन करत मोठा टप्पा गाठला आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यासह किया फक्त तीन वर्षांमध्ये १०० आऊटलेट्सचे शक्तिशाली व पूर्व-मालकीच्या वेईकलचे नेटवर्क विकसित करणारी भारतातील सर्वात वेगवान ओईएम ठरली आहे.
दीर्घकालीन मूल्य आणि ग्राहक-केंद्रित सोल्यूशन्स वितरित करण्याप्रती कटिबद्धतेशी बांधील राहत किया इंडिया आपल्या सीपीओ वेईकल्सवर जवळपास २ वर्षे/४०,०० किमीपर्यंत वॉरंटी कव्हरेज, तसेच ४ मोफत नियतकालिक मेन्टेनन्स सर्विसेस् देते. ज्यामुळे भारतातील ऑटो उद्योगामध्ये हा सर्वसमावेशक व ग्राहक-केंद्रित सर्टिफाईड प्री-ओन्ड उपक्रम आहे.
कंपनीचे सीपीओ नेटवर्क आता ७० हून अधिक शहरांपर्यंत पसरलेले आहे आणि किया इंडियाच्या एकूण रिटेल उपस्थितीपैकी जवळपास ६० टक्के आहे, ज्यामधून ग्राहकांमध्ये प्रमाणित, उच्च दर्जाच्या पूर्व-मालकीच्या वेईकल्ससाठी वाढती मागणी दिसून येते.
किया इंडियाचे मुख्य विक्री अधिकारी श्री. जून्सू चो म्हणाले, ”भारतात तीन वर्षांमध्ये आमच्या सर्टिफाईड प्री-ओन्ड नेटवर्कसाठी १०० आऊटलेट्सचा टप्पा पार करण्यामधून ग्राहकांचा किया ब्रँडवर असलेला दृढ विश्वास दिसून येतो. या अल्प कालावतधीत आमचा सीपीओ व्यवसाय धोरणात्मक विकास स्रोत बनला आहे, ज्याला अपवादात्मक दर्जा, विश्वसनीयता आणि विश्वासाचे पाठबळ आहे. आमच्या विशेष, डिझाइन-अग्रणी आऊटलेट्स आणि पूर्णत: डिजिटल अनुभवाच्या माध्यमातून आम्ही पूर्व-मालकीच्या कार बाजारपेठेला नवीन आकार देत आहोत, तसेच ग्राहकांना नवीन किया वेईकलशी संलग्न असलेला तोच आत्मविश्वास आणि सोयीसुविधा देत आहोत. आम्ही हे नेटवर्क विस्तारित करत असताना ग्राहक-केंद्रित सोल्यूशन्स, दीर्घकालीन मूल्य आणि विनासायास मालकीहक्क प्रवास देण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत, ज्यामधून कियाचा सर्वोत्तम गतीशीलता अनुभव देण्याप्रती प्रेरणादायी प्रवास दिसून येतो.”
किया इंडियाच्या सीपीओ वेईकल्सची प्रखर १७५-पॉइण्ट दर्जात्मक तपासणी करण्यात येते आणि फक्त १,००,००० किलोमीटरपेक्षा कमी अंतर पूर्ण केलेल्या आणि स्ट्रक्चरल नुकसानापासून मुक्त असलेल्या कठोर पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या कारच प्रमाणित केल्या जातात. अस्सल किया पार्टससह सुधारणा करण्यात आलेल्या आणि प्रमाणित मालकीहक्क व सर्विस हिस्ट्रीचे पाठबळ असलेल्या या वेईकल्स अद्वितीय पारदर्शकता आणि विश्वसनीयता देतात.