मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- किया इंडिया या आघाडीच्या मास-प्रीमियम कारमेकर कंपनीने आज त्यांची पहिली मेड-इन-इंडिया ७-सीटर इलेक्ट्रिक वेईकल ‘कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही’च्या बुकिंग्जना २२ जुलै २०२५ पासून सुरूवात होण्याची घोषणा केली. ग्राहक २५,००० रूपये सुरूवातीची रक्कम भरत किया इंडियाच्या वेबसाइटवर तसेच देशभरातील किया डिलरशिप्समध्ये कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही बुक करू शकतात. संभाव्य ईव्ही ग्राहकांच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीमध्ये स्टाइल, कार्यक्षमता, एैसपैस जागा आणि स्मार्ट वैशिष्ट्ये आहेत, जेथे किफायतशीरपणाबाबत कोणतीच तडजोड करण्यात आलेली नाही.
किया इंडियाचे मुख्य विक्री अधिकारी श्री. जून्सू चो म्हणाले, ”कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही इलेक्ट्रिक गतीशीलतेला सर्वसमावेशक व सहजसाध्य करण्याप्रती किया इंडियाच्या प्रवासामधील महत्त्वपूर्ण क्षण आहे. ही भारतामधून प्रेरित आमची पहिली इलेक्ट्रिक वेईकल आहे. या ७-सीटर ईव्हीमधून स्मार्ट, शाश्वत व सहजसाध्य ईव्ही सोल्यूशन्स देण्याप्रती आमच्या दृष्टिकोनासह वास्तविक पैशांचे मूल्य तत्त्व दिसून येते. ही वेईकल आमच्या क्षमतापूर्ण ईव्ही इकोसिस्टमसह परिपूर्ण मन:शांतीची खात्री देईल, ज्यामध्ये मायकिया अॅपवरील के-चार्ज वैशिष्ट्य आणि २५० हून अधिक ईव्ही-सुसज्ज वर्कशॉप्सच्या प्रबळ नेटवर्कसह डीसी फास्ट चार्जरने सुसज्ज १०० हून अधिक डिलरशिप्सचा समावेश आहे. आम्हाला बुकिंग्ज सुरू करण्याचा आनंद होत आहे, तसेच आम्ही ग्राहकांना कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही खरेदी करण्याचे आवाहन करतो.”
कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीमध्ये कियाचे जागतिक डिझाइन तत्त्व ‘ऑपोझिट्स युनायटेड’ आहे. नाविन्यता आणि उपलब्धता क्षमतेला एकत्र करत कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान, समकालीन डिझाइन व अपवादात्मक मूल्याच्या माध्यमातून इलेक्ट्रिक गतीशीलतेला नव्या उंचीवर घेऊन जाते. आकर्षक एक्स्टीरिअर आणि प्रीमियम एैसपैस केबिनसह ही इलेक्ट्रिक आरव्ही भारतातील ईव्ही विभागात नवीन मापदंड स्थापित करण्यास सज्ज आहे.
कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीमध्ये प्रभावी व प्रतिसादात्मक कार्यक्षमतेसाठी विश्वसनीय आणि कार्यक्षम इलेक्ट्रिक पॉवरट्रेनची शक्ती आहे. ही ईव्ही दोन बॅटरी पर्यायांसह येते – ४२ केडब्ल्यूएचसह एआरएआय-प्रमाणित ४०४ किमी रेंज (एमआयडीसी फुल) आणि ५१.४ केडब्ल्यूएच बॅटरी पॅकसह एआरएआय-प्रमाणित ४९० किमी रेंज (एमआयडीसी फुल).
आत्मविश्वासपूर्ण व सुलभ कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्यात आलेल्या कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीमध्ये फास्ट चार्जिंग क्षमता (१०० केडब्ल्यू डीसी चार्जरच्या माध्यमातून फक्त ३९ मिनिटांमध्ये १० टक्के ते ८० टक्के) आहेत. तसेच इलेक्ट्रिक मोटर १२६ केडब्ल्यू व ९९ केडब्ल्यू आऊटपूटसह २५५ एनएम टॉर्क देतात. या ईव्हीमध्ये पॅडल शिफ्टर्सचा वापर करत रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमचे चार स्तर आहेत.
किया सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देते, जे कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीमध्ये प्रबळपणे दिसून येते. या ईव्हीमध्ये एडीएएएस लेव्हल २ सह २० ऑटोनॉमस वैशिष्ट्ये आणि १८ हाय-सेफ्टी वैशिष्ट्यांची प्रबळ श्रेणी आहे, ज्यामधून प्रत्येक ड्राइव्हदरम्यान प्रवाशांचे संरक्षण व मन:शांतीची खात्री मिळते. या वेईकलमध्ये ९० कनेक्टेड कार वैशिष्ट्यांची शक्तिशाली श्रेणी देखील आहे, ज्यामध्ये स्मार्टफोन एकीकरण, इंटेलिजण्ट नेव्हिगेशन आणि रिमोट-कंट्रोल क्षमतांचा समावेश आहे.
केबिनमधील एकूण अनुभव अधिक उत्साहित करत कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीमध्ये ६७.६२ सेमी (२६.६२ इंच) ड्युअल पॅनोरॅमिक डिस्प्ले पॅनेल आहे, ज्यामध्ये भविष्यवादी कॉकपीट अनुभवासाठी इन्फोटेन्मेंट आणि ड्रायव्हर इन्स्ट्रूमेंशन आहेत. इतर आरामदायी वैशिष्ट्ये आहेत, स्मार्ट इन्फोटेन्मेंट-टेम्परेचर कंट्रोल स्वॅप स्विच, ६४-कलर अॅम्बियण्ट केबिन लायटिंग, दुसऱ्या रांगेतील सीट्ससाठी वन-टच इलेक्ट्रिक टम्बल, अतिरिक्त सोयीसुविधेसाठी बोस मोड आणि ड्युअल पेन पॅनोरॅमिक सनरूफ, जे केबिनमध्ये नैसर्गिक प्रकाश आणते.
कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही एचटीके प्लस, एचटीएक्स, एचटीएक्स इआर, एचटीएक्स प्लस इआर या ४ व्हेरिएण्ट्समध्ये आणि ग्लेशियर व्हाइट पर्ल, ग्रॅव्हिटी ग्रे, अरोरा ब्लॅक पर्ल, प्युटर ऑलिव्ह, इम्पेरिअल ब्ल्यू व आयव्हरी सिल्व्हर मॅट या ६ रंगांमध्ये उपलब्ध आहे.