मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- किया इंडिया या आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने आज त्यांची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकल ‘कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही’ लाँच केली. या इलेक्ट्रिक वेईकलची किंमत १७.९९ लाख रूपयांपासून सुरू होते.
संभाव्य ईव्ही ग्राहकांच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीमध्ये एैसपैस जागा, सर्वोत्तमता आणि स्थिरतेचे अद्वितीय संयोजन आहे, जेथे किफायतशीरपणाबाबत कोणतीच तडजोड करण्यात आलेली नाही. मित्र किंवा कुटुंबासोबत लांबच्या प्रवासावर जायचे असो, वीकेण्ड गेटवेचा आनंद घ्यायचा असो किंवा शहरामध्ये दैनंदिन प्रवास करायचा असो कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही सर्व गोष्टींची सहजपणे हाताळणी करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. या कारची सर्वसमावेशक डिझाइन आणि अद्वितीय कार्यक्षमतेमधून कियाचा इलेक्ट्रिक गतीशीलतेचा दृष्टिकोन दिसून येतो, जो निवडक पैलूंच्या पुढे जातो. यामुळे ही वेईकल स्मार्टर, हरित आणि अधिक व्यावहारिक ड्रायव्हिंग अनुभवाचा शोध घेत असलेल्या प्रत्येकासाठी आहे.
या घोषणेबाबत मत व्यक्त करत किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. ग्वांगू ली म्हणाले, ”आम्ही नाविन्यता, स्थिरता आणि ग्राहकांच्या सर्वसमावेशक गरजांच्या सखोल माहितीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक गतीशीलतेच्या भविष्यामध्ये अग्रस्थानी आहोत. वर्षानुवर्षे आम्ही प्रबळ जागतिक ईव्ही पोर्टफोलिओ निर्माण केला आहे आणि आम्हाला भारतात ते कौशल्य आणण्याचा अभिमान वाटतो. कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही या प्रवासामधील पुढील पाऊल आहे. ही कार तीन मुलभूत आधारस्तंभांवर डिझाइन करण्यात आली आहे – आमचे प्रमाणित जागतिक ईव्ही तंत्रज्ञान, ड्रायव्हिंग अनुभव उत्साहित करणारी प्रगत वैशिष्ट्ये आणि आमचे अद्वितीय आरव्ही तत्त्व, जे हालचाल, स्थिरता व एकतेसाठी ओळखले जाते. भारतातील पहिली इलेक्ट्रिक आरव्ही किया कॅरेन्स क्लॅव्हिस महत्त्वाकांक्षा व एकतेसह पुढे जात असलेल्या देशासाठी विचारपूर्वक डिझाइन करण्यात आली आहे. भारतामधून प्रेरित आमची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकल भविष्याकडे वाटचाल करण्याची नवीन ‘ई-वी’ संकल्पना पुढे घेऊन जात आहे.”
भारतासाठी चाचणी करण्यात आलेल्या प्रमाणित क्षमता
कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीमध्ये विश्वसनीय व कार्यक्षम इलेक्ट्रिक पॉवरट्रेनची शक्ती आहे, जे सुलभ व प्रतिसादात्मक कार्यक्षमता वितरित करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. या वेईकलमधील बॅटरी जागतिक स्तरावर बेंचमार्क आणि स्थानिक पातळीवर सत्यापित आहे, ज्यामधून सुरक्षितता, टिकाऊपणाचे उच्च मानक आणि भारतातील स्थितींशी जुळवून जाण्याच्या क्षमतेची खात्री मिळते.