इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – कोणत्याही मनुष्याची नातेसंबंधाची गोष्ट वेगळी असते. त्या नात्याप्रमाणे चुंबन याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. पाश्चात्य देशात सार्वजनिक ठिकाणी किस करणे, चुंबन घेणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. परदेशात थँक्स आणि वेलकम म्हणण्यासाठी किस घेतात, त्यामुळे परदेशात ही गोष्ट खूप सर्वसामान्यपणे घेतली जाते. भारतीय संस्कृतीत मात्र तसे नाही. चुंबन घेण्याचे शारिरीक आणि मानसिक खुप फायदे आहेत. ते काय आहेत हे आपण आता जाणून घेऊ…
दोन व्यक्तींच्या नात्यांमधील भावनांना अधिक गडद करण्यासाठी चुंबन घेतले जाते. दोघांच्या नात्यांमध्ये प्रेम आणि स्नेहाची भावना वाढवण्यासाठी, ती व्यक्त करण्यासाठी चुंबन हा एक सुंदर मार्ग आहे. नात्यातील आपले ऋणानुंबध अधिक घट्ट करण्याचे कामही चुंबन करते.
काही तज्ज्ञ म्हणतात की, चुंबन म्हणजे दोन व्यक्तींमधील अंतरिक भावना व्यक्त करणे, त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देणे समजले जाते. चुंबन हे कोणत्याही जोडप्यांच्या प्रेमाच्या प्रतीकापुरते मर्यादित नाही, तर आई-वडील, भाऊ-बहीण, वडील-मुलगी, आई-मुलगा यांचे नातेही दाखवते. म्हणजेच, ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करता त्याचं चुंबन घेण्याचा अधिकार तुम्हाला असतो.
चुंबन केल्याने तुमच्या शरीरातील आनंदी हार्मोन वाढतात. चुंबन घेण्याची प्रक्रिया मेंदूतील रासायनिक प्रक्रियेला उत्तेजन देते, त्यामुळे ऑक्सिटोसिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन मेंदूत निर्माण होते. त्यामुळे मेंदुतील आनंद राहण्याच्या प्रक्रियेला उत्तेजन मिळते. आणि शरीराला त्याचा फायदा होता. चुंबन घेतल्यामुळे तुमच्या कोर्टिसोल म्हणजेच तुमच्यातील असलेल्या तणावाची पातळीही कमी होते.
कोणत्याही नात्यात अधिक प्रेम, आपुलकी निर्माण करायची असेल, एकाच धाग्यात गुंफून ठेवायचे असेल तर चुंबन हे तुमच्यासाठी स्पेशल असते. ज्यावेळी तुम्ही एखाद्याचे चुंबन करता, त्यावेळी ऑक्सिटोसिन हार्मोन सोडल्यामुळे तुमच्या नात्यामध्ये आपुलकी आणि जिव्हाळ्याची भावना निर्माण होते. चुंबन म्हणजे तुमच्या नात्यामध्ये आनंद आणि समाधान व्यक्त करण्यासारखे आहे. त्यामुळे नातेसंबंधात महत्वाची भूमिका ही चुंबनाचीही असते.
मानसोपचार तज्ज्ञ व डॉक्टर सांगतात की, एक मिनिट चुंबन केल्याने शरीरातील जवळपास ६ कॅलरिज नष्ट होतात. ज्यावेळी एखादे जोडपे चुंबन घेते तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये लव्ह हार्मोन नावाचा ऑक्सिटोसिन हार्मोन तयार होतो. या हार्मोनमुळे एकमेकांच्या नात्यातील आपुलकी आणि आसक्तीची भावना निर्माण होते.
विशेष म्हणजे चुंबनामुळे आनंदी संप्रेरक वाढवण्याव्यतिरिक्त, चुंबन तुमची कोर्टिसोल पातळी वाढवते आणि अशा प्रकारे तुमची नैतिक मूल्ये सुधारते. चुंबन केल्याने कॉर्टिसोलची पातळी आणि तणाव कमी होतो. चुंबन घेणे आणि इतर प्रेमाने मिठी मारणे किंवा माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणणे आपल्याला असलेल्या तणावावर त्याचा परिणाम होता,तसेच शारीरिक प्रक्रियांवरही परिणाम होतो.
Kissing is Beneficial for mind and Body Science