नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव तहसील कार्यालयावर आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी कॉम्रेड राजू देसले, साधना गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. राज्यपालाची पदावरुन हकालपट्टी करावी, नांदगाव तालूक्यात कसत असलेल्या वनजमिनी नावावर करण्यात येऊन त्याचे क्षेत्रफळ मोजून द्यावे, तालूक्यातील शेतक-यांचे अतीवृष्टीमुळे नुकसान झाले त्यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, पांझण, साकोरा शिवाराच शेतक-यांना दमदाटी करणाऱ्यांवर कारवाई करावी, यासह अन्य मागण्यासाठी मोर्चा काढण्यात येऊन तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.