रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांची अप्रत्यक्षपणे भिकाऱ्यांशी तुलना केल्याचे सांगत कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याचा किसान सभेने केला निषेध

by India Darpan
फेब्रुवारी 14, 2025 | 7:13 pm
in संमिश्र वार्ता
0
विभाग स्तरावर कृषी कक्ष स्थापन करणार 2 1024x657 1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भिकारी सुद्धा दिलेला एक रुपया घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला, असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. कृषी मंत्र्यांचे हे विधान स्वाभिमानी शेतकऱ्यांचा घोर अपमान करणारे आहे. किसान सभा त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दांमध्ये धिक्कार करत आहे.

भिकारी एक रुपया घेत नाही, शेतकरी मात्र एक रुपयात पीक विमा घेतात असाच त्यांच्या वक्तव्याचा अर्थ होतो. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे रास्त दाम दिले असते, त्यांची लूट केली नसती, तर त्यांना अशा दीड दमडीच्या योजनांची कोणतीही आवश्यकता भासली नसती, ही बाब कृषी मंत्र्यांनी लक्षात ठेवावी.

शेतकऱ्यांसाठी किंवा श्रमिकांसाठी राबवण्यात येत असणाऱ्या योजना, शेतकरी श्रमिकांच्या कष्टाच्या पैशातून भरलेल्या सरकारी तिजोरीतूनच राबवण्यात येतात. कृषिमंत्र्यांच्या किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांच्या खाजगी मालमत्तेच्या पैशातून या योजना राबवण्यात येत नाहीत ही बाब सुद्धा कृषिमंत्र्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. सोयाबीनची सरकारी खरेदीची मुदत वाढवण्याबाबत पत्रकारांनी कृषिमंत्र्यांना प्रश्न विचारला असता, ही बाब कृषी विभागाच्या अखत्यारीत येत नसून ती पणन विभागाच्या अंतर्गत येते असे उत्तर देत, याच कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना घामाचे दाम देण्याची जबाबदारी झटकली होती.

स्वतः शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची व त्यांना घामाचे दाम देण्याची जबाबदारी घ्यायची नाही. दुसऱ्या बाजूला त्यांच्याच कष्टाच्या पैशातून भरलेल्या तिजोरीतून राबवण्यात येत असलेल्या योजनांच्या अंमलबजावणी बाबत, शेतकरी श्रमिकांचा अपमान करणारी विधाने करायची. कृषिमंत्र्यांची ही मानसिकता सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे.

कृषिमंत्र्यांनी व राज्य सरकारने सदरील वक्तव्याबद्दल माफी मागावी, आपले विधान मागे घ्यावे व शेतकऱ्यांना घामाचे दाम देता येईल यासाठी शेतीमालाची रास्त दराने सरकारी खरेदीची मुदत वाढवत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेतर्फे डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत,उमेश देशमुख
डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना सत्तेचा माज चढलाय…जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

Next Post

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक…या विषयांवर झाली चर्चा

India Darpan

Next Post
10 1 1024x589 1

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक…या विषयांवर झाली चर्चा

ताज्या बातम्या

modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011