संगमनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदी निवडून आल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतीची निवडणूक दुरंगी झाली. या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत शशिकला शिवाजी पवार यांनी सुशीला उत्तम पवार यांचा पराभव केला. शशिकला पवार या अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या होत्या. राज्यातील ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे निकाल हळूहळू हाती येत आहे. त्यात काही निवडणूक या लक्षवेधी असून त्याची चर्चा सुरु आहे. निळवंडे येथील निवडणुकही इंदोरीकर महाराजामुळे चर्चेत आली. इंदोरीकर महाराज प्रसिद्ध किर्तनकार असल्यामुळे त्यांच्या सासूबाई विजयी झाल्याची बातमी सर्वत्र प्रसारीत झाली व ही निवडणूक चर्चेची ठरली.
Kirtankar Indorikar Maharaj Sasubai Sarpanch Win