मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना सोमय्या यांनी उत्तर दिले आहे. सोमय्या म्हणाले की, २०१७ मध्ये संजय राऊतने अशाच प्रकारे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी माझी पत्नी प्रा डॉ मेधा सोमय्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. आता माझा मुलगा नीलचे नाव घेतले. ठाकरे सरकारच्या नेत्यांनी माझ्याविरुद्ध १०+३ खटले/चौकशी दाखल केले आहेत. आम्ही भ्रष्टाचार केला नाही, चौकशी करा, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केलेले आरोप असे
– दलालाला भडवे म्हणतात.
– दलालाने आरोप केला की उद्धव ठाकरे यांनी अलिबाग येथे १९ बांधले. आपण ४ गाड्या बुक करु आणि ते बंगले पाहून येऊ. ते दिसले नाही तर दलालाला जोड्याने मारु
– जे बंगले सांगितले जात आहेत त्या बंगल्यात बसून पार्टी करु आपण
– सोमय्या मराठी भाषेविरोधात कोर्टात गेले हे तेच आहेत
– माझे आरोप करणाऱ्यांना आव्हान आहे, पाटणकरांनी कर्जतमध्ये देवस्थानांची जमीन कुठे, केव्हा आणि कशी घेतली हे दाखवा, सिद्ध करा
– राकेश वाधवानने भाजपला २० कोटी रुपये पक्ष देणगी दिली आहे.
– निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची. ती आहे नील किरीट सोमय्याची. आणि हाच नील राकेश वाधवानचा पार्टनर आहे.
– पीएमसी घोटाळ्यातील राकेश वाधवानचा सोमय्याशी थेट आर्थिक संबंध आहे
– वाधवानला ब्लॅकमेल केले आणि त्याच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले. सोमय्याच्या फ्रंटमॅन देवेंद्र लधानीच्या नावे वसईत साडेचार कोटी रुपयांची जमीन वाधवान कडून घेतली.
– निकॉन फेज १ आणि निकॉन फेज २ या बिल्डींग बांधल्या जात आहेत. मी राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांना आवाहन करतो की त्यांनी या प्रकल्पांमध्ये लक्ष घालावं. पर्यावरण परवानगी या प्रकल्पांना नाही.
– हे सर्व प्रकरणी मी ईडीच्या कार्यालयात तीनदा पाठवले पण त्याची दखल घेतली नाही.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1493586323214860288?s=20&t=LqoKXx-894KaqNSVH0l9Pg
किरीट सोमय्या यांना ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी राऊत यांची परिस्थिती समजू शकतो. मी काहीही न केलेल्या प्रकरणाच्या चौकशीचे स्वागत करतो. ठाकरे आणि राऊत यांनी कोविड सेंटर घोटाळ्याबाबत अवाक्षरही काढलेले नाही. प्रवीण राऊत आणि सुजीत पाटकर यांच्याशी असलेल्या संबंधांचाही त्यांनी उल्लेख केलेला नाही. मात्र, भ्रष्टाचाराविरोधातील माझी लढाई सुरूच राहिल, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1493562197972193280?s=20&t=LqoKXx-894KaqNSVH0l9Pg