मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला खुले आव्हान देत कोल्हापूर दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वातावरण पेटण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी सोमय्या यांना कोल्हापूरमध्ये येण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली होती. त्यानंतर सोमय्या हे कोल्हापूर सीमेवरुन परतले होते. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. याच प्रकरणी कोल्हापूर पोलिस स्टेशनमध्ये मंगळवारी (२८ सप्टेंबर) रोजी दुपारी १२ वाजता मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची तक्रार करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे. तसेच, त्यांनी सोमवारचा सविस्तर कोल्हापूर दौराही जाहिर केली आहे.
सोमवार (२७ सप्टेंबर) रोजी दुपारी २.४५ वाजता सिद्धिविनायक प्रभादेवी ते महालक्ष्मी अंबामाता कोल्हापूर यात्रेचा शुभारंभ होणार आहे. प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गोपाल शेट्टी उपस्थित राहणार आहेत. २८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मुरगूड, कागल, कोल्हापूर पोलीस स्टेशनला हसन मुश्रीफ घोटाळ्याची तक्रार करणार आहे, असे सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे.
उद्या २७ सप्टेंबर दुपारी २.४५ वाजता, माझा सिद्धिविनायक प्रभादेवी ते महालक्ष्मी अंबामाता कोल्हापूर यात्रेचा शुभारंभ
प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गोपाल शेट्टी उपस्थित राहणार आहे
मी २८ सप्टेंबर दुपारी १२ वाजता मुरगूड, कागल, कोल्हापूर पोलीस स्टेशनला हसन मुश्रीफ घोटाळा ची तक्रार करणार pic.twitter.com/fMpV8WXo1g
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) September 26, 2021