मुंबई – भाजप नेते किरीट सौमय्या ठाकरे उद्या नाशिकमध्ये येणार असून ते पालकमंत्री छगन भुजबळ यांची बेनामी मिळकत व आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चरची पाहणी करणार आहे. सात दिवसापूर्वीच त्यांनी एक ट्विट करत सरकारचे मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांचा ₹100 कोटींचा बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचे म्हटले होते. पण, या इमारतीचे मालक अर्शद सिद्दीकी यांनी या मालमत्तेच्या व्यवहारात भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाचा संबध नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता सोमय्या यांनी पुन्हा भुजबळांवर निशाणा साधला असून त्यांनी आता मालमत्तेची पाहणी करण्याचे निश्चित केले आहे. तसे ट्विटही त्यांनी केले आहे. या पाहणीनंतर भाजप कार्यालयात ते पत्रकारांशी संवाद साधणार आहे.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1432521959368101891?s=20