मुंबई – भाजप नेते किरीट सौमय्या विविध आरोप करुन नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या आरोपामुळे अनेक वेळा वादही ओढावतो व आरोप – प्रत्यारोपही होतात. पण, त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर किंवा आरोपानंतर त्या नेत्यांवर कारवाई होते. त्यात ईडीचे प्रकरण जास्त आहे. गेल्या दोन दिवसात परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस तर शिवसेनेच्या खा. भावना गवळी यांच्या पाच संस्थेवर ईडीने छापे टाकले. त्यामुळे सोमय्या पुन्हा चर्चेत आले. त्यांनी या सर्व कारवाईच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत अकरा नेत्यांची नावेच टाकली आहे. त्यात काहींवर कारवाई होणार आहे. तर काहींची सुरु आहे. यातील काही नेत्यांवर अगोदर कारवाई झाली आहे. आता सोमय्याच्या निशाणा-यावर कोण आहे हे अकरा नेते हे यादीच त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये बघू
https://twitter.com/KiritSomaiya/status/1432136125607383040?s=20