मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयएनएस विक्रांत प्रकरणी मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा नोटीस बजावूनही भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या हे चौकशीसाठी गाृैरहजर राहिले आहेत. मुंबई पोलिसांनी पिता-पुत्रांना नोटीस बजावल्यानंतर हे दोघे नॉट रिचेबल आहेत. ते दुसऱ्यांदा चौकशीसाठी हजर न राहता त्यांचे वकील विवेकानंद गुप्ता पोलिस आयुक्तालयात हजर झाले.
सोमय्यांचे वकील गुप्ता म्हणाले की, अत्यंत किरकोळ रकमेची केस आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली आहे. सरकारचा पोलिसांवर दबाव असल्याचे दिसून येते. किरीट आणि नील सोमय्या हे कायदेशीर लढाई लढत आहेत. ५८ कोटींची बाब अतिशय खोटी आहे. ज्यांनी आरोप केला आहे त्यांनी एकही पुरावा दिलेला नाही. किंवा तसे सिद्ध करावे. सोमय्या हे योग्यवेळी समोर येतील, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.