विशेष प्रतिनिधी, मुंबई
जगाच्या इतिहासात अनेक अफलातून कहाण्या आहेत. त्यात जगभरातील राजे-महाराजांचे किस्से तर विचारूच नका. कुणी राजा त्याच्या क्रौर्यासाठी ओळखला जायचा, तर कुणी उदारतेसाठी. मात्र जगात एक असाही राजा होऊन गेलो जो सनकी होता, पण त्याची संताप व्यक्त करण्याची पद्धतच निराळी होती. या बादशहाला आपल्या सैन्यात ऊंचीने मोठ्या सैनिकांना नोकरीवर ठेवण्यात आणि त्यांना जास्त वेतन देण्यात रस होता. अर्थात हे वेतन प्राप्त करण्यासाठीही सैनिकांना बराच अपमान सहन करावा लागत होता, ही वेगळी बाब.
प्रशा नावाचे एक राज्य होते. १९३२ मध्ये के जर्मनीक सामील झाले. या प्रशाचा एक राजा होता, त्याचे नाव होते फ्रेडरिक विल्यम्स प्रथम. त्याने १७१३ के १७४० या कालावधीत प्रशावर राज्य केले. फ्रेडरिक विल्यम्स हा शांत आणि दयावान राजा होता. मात्र त्याला आपल्या सैन्यात ऊंचीने मोठ्या सैनिकांना ठेवण्यात विशेष रस होता.
असेही बोलले जाते की प्रशाच्या सैन्यात जवळपास ३८ हजार सैनिक होते. त्यात वाढ करून त्याने ८३ हजार केले. ऊंच सैनिकांबद्दल विशेष आग्रही असायचा. त्यांचे एक वेगळे रेजिमेंट त्याने तयार केले होते. त्याला पॉट्सडॅम जायंट्स म्हटले जायचे. यातील सारे सैनिक सहा फुटांपेक्षा जास्त ऊंच होते.
राजा फ्रेडरिकच्या सेनेत जो सर्वांत ऊंच सैनिक होता त्याची ऊंची ७ फूट एक इंच होती. सर्वांत गमतीदार बाब म्हणजे या सैनिकांना कुठल्याही युद्धासाठी तयार केले जात नव्हते. तर ते फक्त दिखाव्यासाठी होते. कधी कधी राजा या सैनिकांकडून मनोरंजनही करून घ्यायचा.
निराश असताना राजा त्यांना महालावर बोलवायचा आणि नाचायला लावायचा. ३१ मे १७४० ला वयाच्या ५१ व्या वर्षी राजाचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याच्या सैन्यात ऊंच सैनिकांची संख्या ३ हजाराच्या आसपास होती. राजाच्या मुलाने कारभार हाती घेतला तेव्हा हे रेजीमेंट रद्द केले.