रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आश्चर्यनक! अंगणात खेळताना ८ वर्षांच्या मुलाला कोब्राने केला दंश; मग त्यानेही चावले नागाला, पुढं हे सगळं घडलं

by India Darpan
नोव्हेंबर 5, 2022 | 5:38 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कुत्रा माणसाला चावल्यास बातमी होणार नाही! कारण ती नेहमीची घटना आहे. परंतु माणूस कुत्र्याला चावल्यास ही निश्चितच बातमी होते. येथे हे सांगण्याचे कारण म्हणजे काहीशी अशाच प्रकारची घटना छत्तीसगडमध्ये घडली असून या संदर्भात आता चर्चेला उदाण आले आहे. कारण खेळत असताना एका मुलाला साप चावला त्याने तेथून पळण्याचा प्रयत्न केला, परंतु सापाने त्याला विळखा घातल्याने तो मुलगा सापाला चावला. त्यानंतर सर्वजण घाबरले मुलाचा मृत्यू होतो की काय? असे सर्वांना वाटले परंतु मुलगा जिवंत असून साप मात्र मेला आहे. विशेष म्हणजे हा साप विषारी असून कोब्रा जातीचा नाग होता असे सांगण्यात येते. छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून सुमारे ३५० किमी अंतरावर असलेल्या जसपूर जिल्ह्यामधील पंढरपेढ या दुर्गम भागातील गावामध्ये ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती देताना गावकऱ्यांनी सांगितले की, दिपक नावाचा हा मुलगा त्याच्या घरामागील अंगणामध्ये खेळत असताना त्याला विषारी कोब्रा सापाने चावा घेतला. सापाने मुलाच्या हाताला विखळा मारून हाताचा चावा घेतला. त्याने हात झटकून सापाला दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे तो मुलगा दोन वेळा सापाला चावला. या घटनेनंतर दिपकला लगेचच उपचारार्थ जवळच्या आरोग्य केंद्रावर नेण्यात आले. तसेच त्याला सापाचे विष उतरवणारे औषध देण्यात आले आणि दिवसभर देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. मात्र दिपकला विषबाधा झाल्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. मात्र अशापद्धतीने व्यक्तीने चावा घेतल्याने सापाचा मृत्यू होणं ही दुर्मिळ घटना आहे.

विशेषतः जसपूर हा दुर्गम आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला नागलोक असेही म्हटले जाते, कारण या ठिकाणी २०० हून अधिक सापांच्या प्रजाती आढळून येतात. तसेच दरवर्षी पावसाळ्यात आणि अन्य ऋतूतही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सर्पदंशाच्या घटना घडतात विशेष म्हणजे तातडीने उपचार न झाल्यास अनेक नागरिक, मुले आणि महिला यांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

King Cobra Bite 8 year old Child
Chhattisgarh

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबईत ऑटो रिक्षा व टॅक्सीचे असे आहेत नवे दर

Next Post

मालेगाव येथे प्लॅस्टिक कारखान्यांना लागली भीषण आग (व्हिडिओ)

Next Post
20221105 072045

मालेगाव येथे प्लॅस्टिक कारखान्यांना लागली भीषण आग (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
Bridge Day 3 2

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत यांना मिळाला विजेतेपद….भारतीय संघांत होणार निवड

मे 31, 2025
bjp11

भाजपाच्या उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा…नाशिकमध्ये यांना संधी

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011