बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पंतप्रधानांनी भूतानचे राजे आणि राणी यांचे केले स्वागत…आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यातील प्रगतीचा घेतला आढावा

by India Darpan
डिसेंबर 5, 2024 | 11:44 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 11

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे भूतानचे महामहिम राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूतानच्या महाराणी जेसन पेमा वांगचुक यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी भूतानच्या राजांना शुभेच्छा दिल्या आणि मार्च २०२४ मधील भेटीदरम्यान भूतानचे सरकार आणि तिथल्या जनतेने केलेल्या प्रेमळ आदरातिथ्याची आठवण करून दिली.

पंतप्रधान आणि महामहिम राजे यांनी उत्कृष्ट द्विपक्षीय संबंधांबाबत समाधान व्यक्त केले, ज्यामध्ये विकास सहकार्य, स्वच्छ ऊर्जा भागीदारी, व्यापार आणि गुंतवणूक, अंतराळ आणि तंत्रज्ञान सहकार्य आणि लोकांमधील संबंध समाविष्ट आहेत. ही आदर्श भागीदारी सर्व क्षेत्रांमध्ये आणखी मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यातील प्रगतीचा आढावा घेतला आणि भूतानच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि भारताच्या लगतच्या सीमावर्ती भागांशी संबंध मजबूत करण्यासाठी महामहिम राजे यांच्या नेतृत्वाखालील गेलेफू माइंडफुलनेस सिटी उपक्रमाबाबत आपले विचार मांडले.

भूतानच्या १३ व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीसाठी भूतानला भारताचे विकास सहाय्य दुप्पट केल्याचे अधोरेखित करून पंतप्रधानांनी भूतानमधील आर्थिक विकासाप्रति भारताच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भूतानच्या सुख, प्रगती आणि समृद्धीच्या आकांक्षांना निरंतर पाठिंबा दिल्याबद्दल महामहिम राजे यांनी पंतप्रधान आणि भारतातील जनतेप्रति कृतज्ञता व्यक्त केली. या बैठकीनंतर महामहिम राजे आणि महाराणी यांच्या सन्मानार्थ पंतप्रधानांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.

या बैठकीने भारत आणि भूतान यांच्यातील नियमित उच्च-स्तरीय आदानप्रदानाची परंपरा अधोरेखित केली, जी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करणारी परस्पर विश्वास, सहकार्य आणि सखोल ज्ञानाची भावना प्रतिबिंबित करते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान आज करणार अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन…या क्षेत्रात आर्थिक संधींना मिळणार प्रोत्साहन

Next Post

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला केले अभिवादन…

Next Post
Untitled 12

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला केले अभिवादन…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011