मुंबई – जगभरातील अनेक देशांमध्ये प्रतिबंधित असलेल्या अनेक वस्तू भारतीय बाजारात अगदी सहज मिळतात. अनेक मोठ्या देशांमध्ये प्रतिबंधित चॉकलेट कँडी येथे बिनबोभाट विक्री होते. भारतात मुलांमध्ये किंडर जॉय खूपच लोकप्रिय चॉकलेट आहे. परंतु अमेरिकेत किंडर जॉय प्रतिबंधित आहे.
अमेरिकेत किंडर जॉयवर बंदी घालण्यामागे त्यामध्ये मिळणाऱ्या खेळण्या हे प्रमुख कारण आहे. किंडर जॉयमध्ये मिळणारी खेळणी जर लहान मुलांनी नजरचुकीने गिळली तर समस्या निर्माण होऊ शकतात. ही शक्यता गृहित धरून अमेरिकेत त्यावर बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे भारतात किंडर जॉयची चांगलीच विक्री होते. द सनच्या वृत्तानुसार त्याचे अधिकृत नाव किंडर सरप्राईज आहे. हे चॉकलेट इटलीमधील ब्रँड फेरारोकडून बनवण्यात आले आहे.
फेडरल फूड, ड्रग अँड कॉस्मेटिक कायद्याअंतर्गत अमेरिकेत यावर बंदी घालण्यात आली होती. या कायद्याअंतर्गत खेळणे असलेल्या कोणत्याही कँडीची विक्री प्रतिबंधित करण्यात आली आहे. याच आधारावर किंडर जॉय विक्रीची परवानगी देण्यात आलेली नाही.
किंडर सपप्राईज कॅनडा आणि मॅक्सिकोमध्ये वैध आहे. परंतु अमेरिकेत निर्यात करणे बेकायदेशीर आहे. चॉकलेट आणि प्लॅस्टिक खेळणी वेगवेगळे करून विक्री करण्यास सुरुवात केल्याने मे २०१७ मध्ये फेरेरो किंडर जॉय अमेरिकेत उपलब्ध झाले होते. किंडर जॉयचे पहिल्या वर्षी २००१ मध्ये अनावरण करण्यात आले होते. डिसेंबर २१०५ मध्ये ते यूकेमध्ये पोहोचले होते.
चिलीमध्ये सुद्धा २०१३ मध्ये एक कायदा मंजूर करण्यात आला होता. खेळणे किंवा काहीतरी लोभ दाखवून विक्रीसाठी प्रोत्साहित करणार्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली होती. चिलीमध्ये किंडर सपप्राईजवर बंदी घालण्यात आली होती.