मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – किआ मोटर्स कंपनीने भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीला किआ कारेन्स (Kia Carens) या मॉडेलबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळेच कंपनीने कारेन्स या मॉडेलच्या तब्बल ४४ हजार १७४ कार ग्राहकांकडून परत मागविल्या आहेत. या मॉडेलच्या सॉफ्टवेअर अपडेटसाठी ‘स्वैच्छिक रिकॉल मोहीम’ जाहीर केली आहे. या कारच्या एअरबॅग कंट्रोल मॉड्युल (ACU) सॉफ्टवेअरमधील कोणत्याही त्रुटी तपासण्यासाठी रिकॉल सुरू करण्यात आले आहे.
दक्षिण कोरियाची कंपनी असलेल्या किआने सांगितले आहे की, “किया इंडिया आपल्या ग्राहकांना एक विकसित होत असलेला ब्रँड अनुभव प्रदान करीत आहे. उत्कृष्ट मालकी अनुभव देण्यासाठी कंपनी वचनबद्ध आहे. किआच्या जागतिक बेंचमार्कद्वारे शासित घटकांची नियमित आणि सूक्ष्म चाचणी करते. आम्ही एक जबाबदार कॉर्पोरेट कंपनी आहोत. तपासणीसाठी वाहने स्वेच्छेने परत बोलावण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आणि आवश्यकता असल्यास सॉफ्टवेअर अपडेट विनामूल्य प्रदान केले जाईल.”
जानेवारीपासून बुकिंग
या वर्षी १४ जानेवारीपासून कंपनीने किआ कारेन्स या कारचे बुकींग सुरू केले. अवघ्या दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत कंपनीने तब्बल ५० हजार बुकिंगचा टप्पा ओलांडला आहे. या कारचे ४२% बुकिंग हे टियर ३ आणि त्यावरील शहरांमधून आहेत. लक्झरी आणि लक्झरी प्लस व्हेरिएंट आमच्या ग्राहकांसाठी लोकप्रिय पर्याय आहेत. कारण ते ४५ % बुकिंग करतात.” किआ कारेन्सची किंमत प्रीमियम ७ सीटसाठी ९.५९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
किआ कारेन्सची वैशिष्ट्ये
– ७ स्पीड DCT आणि ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय, १.४ लिटर GDI पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. यात १.५ लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन पर्याय देखील मिळतो. जो ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेला आहे. यात दुसऱ्या रांगेतील प्रवाशांसाठी हवेशीर जागा, एअर प्युरिफायर आणि वन-टच टम्बल डाउन फंक्शन मिळते. कॅरेन्स ६ आणि ७ सीटर पर्यायांमध्ये ऑफर केली जाते.
– प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केर्न्सच्या प्रत्येक मॉडेलमध्ये ६ एअरबॅग देण्यात आल्या आहेत. MPV ला ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स, मागील पार्किंग सेन्सर्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, सर्व चाकांवर डिस्क ब्रेक, ESC, ABS आणि डाउनहिल ब्रेक कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. यात Apple कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 8-स्पीकर बोस सराउंड सिस्टम आणि सनरूफ सारखी वैशिष्ट्ये आहेत.
Kia Recall 44 Thousand Cars for This Reason
Kia Carens Automobile Air Bag Software