मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संगीतकार-गायक अवधुत गुप्ते याचा ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धूम करण्यास सज्ज आहे. खुपते तिथे गुप्तेचे नवीन सत्र राजकीय टोलेबाजीने रंगणार असल्याचे चित्र आहे. नवीलन सत्राच्या पहिल्याच भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिसणार असून यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीदेखील मुलाखत असणार आहे.
खुपते तिथे गुप्तेच्या यापूर्वीच्या सत्राला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. अवधुत गुप्तेची हटके स्टाइल, थेट-खोचक प्रश्न आणि धमाल असलेला हा कार्यक्रम चांगलाच हिट झाला होता. त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदविला होता. अनेक सेलिब्रेटीच्या आयुष्यातील गुपिते, त्यांचे स्वभाव, त्यांचे किस्से या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांना कळले होते.
https://twitter.com/zeemarathi/status/1660907161894125568?s=20
बऱ्याचशा भागांमध्ये सेलिब्रेटी हळवे झाल्याचेही प्रेक्षकांनी अनुभवले. अशा या लोकप्रिय कार्यक्रमाचे नवीन सत्र येणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुगता ताणल्या गेली आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर खुपते तिथे गुप्तेच्या भागाचा प्रोमो शेअर करण्यात येत आहे. पहिल्या प्रोमोमध्ये राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांची मिमिक्रीही केली. इतकंच नाही तर त्यांनी त्यांचा लेक पार्थ पवार यांच्यावरुनही टोला लगावला.
शिंदे म्हणाले…
मुख्यमंत्री आणि ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे यांची एंट्री या कार्यक्रमात झाली आहे. या कार्यक्रमात अवधुत गुप्ते मुख्यमंत्री शिंदेंना प्रश्न विचारतो. जर तुम्हाला एक फोन करायची संधी देण्यात आली, तर तो कॉल तुम्ही कोणाला कराल. दिवंगत आनंद दिघे यांना की दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना?. गुप्तेंच्या या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांनी डिप्लोमॅटीक उत्तर दिलं आहे. अरे अवधुत, कॉन्फरन्स कॉल केला तर चालेल, मला दोघांशीही बोलायचंय, असे उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे.
https://twitter.com/ZEE5Marathi/status/1660522953359118339?s=20
Khupte tithe Gupte Interview Raj Thackeray Eknath Shinde