मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केली आहे.
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
आज पहाटे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ
खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ४० ते ४५ जण गंभीररीत्या जखमी झाले होते. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेतील जखमी प्रवाशांची विचारपूस केली.पहाटे हे प्रवासी पुण्याहून मुंबईकडे येत असताना… pic.twitter.com/8bfpy8T2Qh
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 15, 2023
पंतप्रधानांकडूनही दखल
महाराष्ट्रात रायगड येथे झालेल्या बस दुर्घटनेने व्यथित झालो आहे. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. अपघातात जखमी झालेले लवकर बरे होतील अशी मी आशा व्यक्त करतो. अपघातग्रस्तांना राज्य सरकार शक्य ती सर्व मदत करत आहे. रायगड अपघातातील मयतांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफमधून रु. 2 लाख आणि जखमींना रु. 50,000 अशी मदत पुरवण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
रायगड अपघातातील मयतांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफमधून रु. 2 लाख आणि जखमींना रु. 50,000 अशी मदत पुरवण्यात येईल: पंतप्रधान @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 15, 2023
Khopoli Bus Accident CM and PM Financial Help Declared