मुंबई – अनेक तरुणांना स्टंटबाजी करणे खूप आवडते. या खेळाकडे आता तरुणीही आकर्षित झाल्या आहेत. टीव्हीच्या एका वाहिनीवरील ‘खतरो के खिलाडी ‘ हा रियालिटी शो खूपच प्रसिद्ध झाला आहे, यामध्ये अर्जून बिजलानी बाजी मारली असून तो या ‘शो ‘ चा विजेता ठरला असून त्याने आकर्षक गोल्डन ट्रॉफी, २० लाख रुपये रोख आणि एक नवीन कार जिंकली आहे.
स्टंट आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी ११’ ने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. गेले काही आठवडे थ्रिलर आणि अॅक्शनने हा शो गाजला आहे. शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. या शो च्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या इतर स्पर्धकांना मागे अर्जुन बिजलानी हा 11 व्या सीझनचा विजेता ठरला आहे. संपूर्ण शो दरम्यान अर्जुनने जबरदस्त खेळ दाखवला. दिव्यांका त्रिपाठी आणि विशाल आदित्य सिंह त्याच्यासह अर्जुन हा पहिल्या तीनमध्ये पोहोचला.
दिव्यांका त्रिपाठीने तिच्या स्टंट्सने एक वेगळी छाप पाडली. छोटया पडद्यावर विविध भूमिकेत दिसणाऱ्या दिव्यांकाने प्रत्येक स्टंट चांगला केला. ती या शोची फर्स्ट रनर अप असून तिने प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकली. अर्जुन व्यतिरिक्त, दिव्यांका, विशाल, श्वेता तिवारी आणि वरुण सूद टॉप ५ मध्ये पोहोचले. हा शो जिंकल्याने अर्जुन बिजलानीला ट्रॉफी, २० लाख रुपये रोख आणि नवीन कार देण्यात आली.
अर्जुन बिजलानी यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून सर्वांचे आभार मानले. त्याने लिहिले की, ‘शोमध्ये जिंकणे आणि हरणे चालूच राहते. शोचा प्रवास महत्त्वाचा आहे. मला वाटते की खतरों के खिलाडी 11 मध्ये आम्ही सर्वांनी चांगली कामगिरी केली. खरे तर विशाल आदित्य सिंग आणि दिव्यांका त्रिपाठी हेही विजेते आहेत. त्यांनी ही तितकेच चांगले काम केले. तसेच त्याने ‘खतरों के खिलाडी’ च्या स्टंट टीम, रोहित शेट्टी, कलर्स टीव्ही आणि चाहत्यांचे आभार मानले.