बुधवार, नोव्हेंबर 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शिवछत्रपती पुरस्कार व अन्य पुरस्काराच्या रकमेत वाढ; खाशाबा जाधवांचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिन

ऑगस्ट 28, 2023 | 10:42 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20230828 WA0385


पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १५ जानेवारी आता राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू स्व.खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी हा दिवस महाराष्ट्राचा राज्य क्रीडा दिन म्हणून आता करण्यात येणार आहे.

शिवछत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), महाळुंगे, बालेवाडी येथे आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

यावेळी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र खेळाला प्रोत्साहन देणारे देशतील अग्रेसर राज्य आहे. त्यामुळे खेळात महाराष्ट्राने घवघवीत यश मिळवले आहे. चौथ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत ५६ सुवर्ण पदकांसह एकूण १६१ पदके मिळवून तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ३९ पदकांसह १४० पदके मिळवून अव्वल कामगिरी केली. राष्ट्रकुल स्पर्धेतही आपल्या खेळाडूंनी यश मिळवले. ऑलिम्पिकमध्येही चांगले यश मिळावे यासाठी सर्व सहकार्य करू. खेळाडूंनी राज्याचा लौकीक आंतरराष्ट्रीय पातळीवर असाच उंचवावा, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

यावेळी शिंदे पुढे म्हणाले की, क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा नितांत आदर राज्य सरकारला आहे. त्यांच्या कार्यातून इतर खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असे सांगून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्या खेळाडूंना पाच लाख रुपये आणि अन्य पुरस्कार विजेत्यांना तीन लाख रुपये देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. आज दिलेल्या पुरस्कार विजेत्यांनाही वाढीव पुरस्कार रक्कम देण्यात येईल, असेही त्यांनी घोषित केले.

यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी भारत २०३६ चे यजमानपद भूषविण्याच्यादृष्टीने पूर्वतयारी करत असून राज्यानेही प्रत्येक क्रीडा प्रकारातील आपली बलस्थाने आणि कमकुवत दुवे ओळखून या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीचा ‘रोडमॅप’ तयार करावा, असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, ऑलिम्पिक स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल. क्रीडातज्ज्ञ आणि खेळाडूंच्या सहकार्याने आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजना तयारी करण्यात यावी. शालेय स्तरावरील विविध स्पर्धांच्या आयोजनात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यावरही भर द्यावा लागेल.

क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात
राज्य शासन अग्रेसर – अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन अग्रेसर आहे. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी देण्यात आलेल्या पुरस्काराच्या रकमेत १ लाख रूपयाऐवजी ३ लाख आणि ३ लाख रूपयाऐवजी ५ लाख रुपये अशी वाढ करण्यासाठी लागणाऱ्या २ कोटी ३८ लाख रुपयांच्या रकमेस मान्यता देण्यात येईल.हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. स्व.खाशाबा जाधव यांच्या जन्म दिवस १५ जानेवारी ‘राज्य क्रीडा दिवस’ म्हणून साजरा करण्याबाबत विचार व्हावा, असे त्यांनी सांगितले. भालाफेकमध्ये गेल्या वर्षी रौप्यपदक आणि यावर्षी जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या आंतरराष्ट्रीय भालाफेकपटू नीरज चोप्रा यांचे आणि पुरस्कारार्थीचे अभिनंदन करून श्री.पवार म्हणाले, खेळाडूंना घडविण्यात त्यांचे कुटुंबीय, प्रशिक्षकाचे फार मोठे योगदान आहेत. भविष्यात अशीच अनेक पदके मिळाविण्याचा खेळाडूंनी प्रयत्न करावा. शासनाकडून नेहमीच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली जाईल.

युवा खेळाडूंनी पुरस्कार
विजेत्यांचा आदर्श घ्यावा – गिरीश महाजन

ग्रामविकास मंत्री श्री. महाजन म्हणाले, खेळाडूंच्या मागणीचा विचार करुन त्यांना आवश्यक क्रीडा सुविधा आणि स्पर्धांना जाण्यासाठी विमान प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळामध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या देण्यात येणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत वाढ केली, अनेक निर्णय राज्य शासनाने घेतले. यापुढेही खेळाडूंना लागणाऱ्या आवश्यक त्या सोई-सुविधा क्रीडा विभागाच्यावतीने देण्यात येईल. आपले खेळाडू विविध क्रीडा स्पर्धात राज्याचे नाव उज्वल करीत आहेत. नवीन खेळाडूंनी यामधून स्फुर्ती घेऊन आपल्या खेळात उत्तम कामगिरी करावी, असेही महाजन म्हणाले.

*क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता वाढीसाठी
मिशन ‘मिशन लक्ष्यवेध’-संजय बनसोडे

क्रीडा मंत्री श्री.बनसोडे म्हणाले, राज्यात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. खेळाडूंना नवीन तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा आणि गुणवत्ता वाढीसाठी ‘मिशन लक्षवेध’ योजनेंतर्गत स्पोर्ट्स सायन्स सेंटर लवकरच सुरु करण्यात येणार आहे. क्रीडा विद्यापीठासाठीदेखील कुलगुरुंची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या स्पर्धकांना आणि त्यांच्या मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रक्कमेत भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पारंपरिक क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी प्रो- कबड्डी लीग स्पर्धेच्या धर्तीवर यावर्षी मुंबईत प्रो- गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी ५० हजार गोविंदांचा विमा उतरविण्यात आला असून विम्याच्या रकमेमधे वाढ करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात दिवसे यांनी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांविषयी माहिती दिली. बुंदेसलिगा या जागतिक क्रीडा संघटनेसोबत करार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरस्कार सोहळा
राज्यपाल महोदयांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन २०१९-२०, सन २०२०- २१ व सन २०२१-२२ या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडू पुरस्कार, एकलव्य खेळाडू पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), साहसी क्रीडा पुरस्कार व जिजामाता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. एकूण ११९ खेळाडू आणि प्रशिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्रीकांत शरदचंद्र वाड यांना सन २०१९-२० या वर्षाचा तर दिलीप बळवंत वेंगसरकर यांना सन २०२०-२१ या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Khashaba Jadhav’s birthday is now State Sports Day

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना आज आनंदी वार्ता समजेल… जाणून घ्या, मंगळवार, २९ ऑगस्ट २०२३चे राशीभविष्य…

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Vichar Dhan

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011