पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिलायन्स जिओने खान्देशवासियांना खुषखबर दिली आहे. कारण, धुळे शहर आज जिओ ट्रू 5G नेटवर्क शी जोडले गेले. याच वेळी 12 राज्यातील 25 शहरांमध्ये एकाच दिवशी 5G लाँच करून जिओ ने एकप्रकारे विश्वविक्रम केला. भारतामध्ये जिओ 5G उपलब्ध असलेल्या शहरांची संख्या 304 वर पोहोचली आहे आजपासून, जिओ वेलकम ऑफर धुळेसह महाराष्ट्रातील जालना, मालेगाव, बीड आणि चाकण येथेही सुरू झाली. ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 1 Gbps+ वेगाने अमर्यादित डेटा मिळेल.
धुळेशिवाय महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, नांदेड, कोल्हापूर ,जळगाव, सांगली, अकोला, चंद्रपूर, लातूर, परभणी, इचलकरंजी आणी अहमदनगर येथे जिओ 5G सेवा सुरू करण्यात आली आहे.
याप्रसंगी बोलताना जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, “ धुळेमध्ये जिओ ची 5G सेवा सादर करताना आम्हाला आनंद होत असून धुळे शहरात 5G सेवा सुरू करणारा जिओ हा पहिलाच ऑपरेटर आहे. आम्ही जिओ ट्रू 5G तंत्रज्ञान त्याच्या विश्वसनीय वायरलेस नेटवर्कसह धुळे आणि महाराष्ट्रातील लोकांना प्रगत आरोग्य सेवेच्या क्षेत्रात फायदा होणार आहे. कृषी, शिक्षण, ई-गव्हर्नन्स, आयटी, एसएमई, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेमिंग आणि इतर अनेक क्षेत्रातही अनेक फायदे मिळतील. महाराष्ट्र डिजीटल करण्यासाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोत.”
आजपासून, शहरातील जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय, 1 Gbps+ पर्यंत स्पीडवर अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी जिओ वेलकम ऑफरसाठी आमंत्रित केले जाईल.
जिओ ही एकमेव कंपनी आहे जिने 4G नेटवर्कवर शून्य अवलंबित्व असलेले स्टँडअलोन ट्रू 5G नेटवर्क तैनात केले आहे. स्टँडअलोन ट्रू 5G सह, जिओ नवीन आणि शक्तिशाली सेवा देऊ शकते जसे की कमी लेटन्सी कनेक्टिव्हिटी, मशीन-टू-मशीन कम्युनिकेशन, 5G व्हॉइस, एज कॉम्प्युटिंग आणि नेटवर्क स्लाइसिंग.
जिओ ट्रू 5G सेवा मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. त्यांना एक जिओ 5G नेटवर्क सुसंगत 5G हँडसेट, राहत्या / कामाच्या ठिकाणी 5G नेटवर्कची उपलब्धता तसेच प्रीपेड आणि सर्व पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी 239 किंवा अधिक वैध सक्रिय योजनेवर असणे आवश्यक असेल. एकदा या निकषांची पूर्तता झाल्यानंतर, जिओ ग्राहकांना जिओ वेलकम ऑफर मिळेल
Khandesh City Reliance True 5G Service Started