मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना दिलासा दिला आहे. याअगोदर पत्नी मंदाकिनी खडसे यांना हाकोर्टाने दिलासा होता. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांनाही दिलासा मिळाला आहे. आज खडसे यांना हायकोर्टाने आठवड्याभराचा अवधी दिला आहे. त्यात नियमित जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर पीएमएलए कोर्टाने तूर्तास कोणतंही वॉरंट जारी न करण्याचे निर्देश दिले आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने एक हजार पानी आरोपपत्रात दाखल केले आहे. त्यात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश केला आहे. आतापर्यंत जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. तर खडसे व त्यांच्या पत्नीला दिलासा दिला आहे.