मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात पत्नी मंदाकिनी खडसे यांचा मुंबई सेशन कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांच्या अटकेची शक्यता आहे. याअगोदरच या प्रकरणात खडसे यांचे जावई यांना अटक केली आहे. त्यात आता पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यात भर पडली आहे.