मुंबई – माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सक्तवसुली संचालनालयाने जळगाव व लोणावळ्यातील ५ कोटीची मालमात्त जप्त केली आहे. पुणे येथील भोसल एमआयडीसी भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
२०१६ मध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना पुण्यातील भोसरी येथे एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यानंतर याप्रकरणी विविध चौकशाही झाल्या. पण, त्यानंतर ईडीकडे हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी या प्रकरणात कारवाई केली. भोसरी येथील भूखंड हे ३१ कोटी रुपयांचे असतांना ३ कोटी ७ लाख रुपयाला घेण्यात आला, रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी केल्याचाही या प्रकरणात आरोप आहे. हा भूखंड मंदाताई खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी संयुक्तरित्या खरेदी केला आहे. याच प्रकरणाची चौकशी सुरु असून त्यात जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अगोदरच अटक केली आहे. तर मंदाताई खडसे यांना समन्स पाठवले आहे. एकनाथ खडसे यांची चौकशी झाली आहे. आता ईडीने ही मालमत्ता जप्त केली आहे.
https://twitter.com/ANI/status/1431132354907500549?s=20