इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केरळच्या अलाप्पुझामध्ये आईच्या प्रेमाला लाजवणारे प्रकरण समोर आले आहे. येथे एका आईने आपल्या नवजात मुलाला बाथरूममध्ये बादलीत सोडून थेट हॉस्पिटल गाठले. त्यानंतर माहिती मिळताच पोलिसांनी घरी पोहोचून नवजात बालकाला वाचवले. याप्रकरणी पोलिसांनी आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलप्पुझा जिल्ह्यातील चेंगन्नूर येथे महिलेची घरीच प्रसूती झाली. यानंतर महिलेने आपल्या नवजात मुलाला बाथरुममधील बादलीत टाकले आणि स्वत: रुग्णालयात आली. महिलेने रुग्णालय प्रशासनाला तशी माहिती दिली. त्यानंतर रुग्णालयाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घरी पोहोचून मुलाला बादलीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात आणले. पोलिसांनी सांगितले की, आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवजात अर्भकाला कोट्टायम मेडिकल कॉलेजमध्ये काळजी आणि उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1643135561753067522?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1643136140185333762?s=20
Kerala Mother Infant Baby Bathroom Bucket