इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात बुद्धिवंतांची कमी नाही, असे म्हटले जाते. काही प्रमाणात ते खरे देखील आहे. कारण लहान मोठ्या शहरातील तसेच खेड्यापाड्यातील तरुण आणि सर्व सामान्य व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करीत नवीन संशोधन करतात. त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या जीवन उपयोगी वस्तू तयार करीत असतात. अशाच प्रकारचे संशोधन केरळमधील एक युवकांनी केला आहे. सध्या पेट्रोल डिझेलचे भाव कुणाला भिडल्याने इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढली आहे. या युवकाने घरच्या घरीच इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यासाठी जुगाड साधला आहे.
केरळच्या कोल्लम जिल्ह्यात राहणाऱ्या अँटोनी जॉनने आपल्या घरी इलेक्ट्रिक कार बनवली आहे. या कारमध्ये 3 जण बसू शकतात. तसेच एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 60 किमी पर्यंत धावू शकते. अँटोनी जॉनने ते बनवण्यासाठी फक्त 4.5 लाख रुपये खर्च केले आहेत.
पेशाने करिअर कन्सल्टंट असलेले जॉन हे घर आणि ऑफिस दरम्यान प्रवास करण्यासाठी या कारचा वापर करतात. पूर्वी अँटोनी जॉन इलेक्ट्रिक स्कूटर वापरत असत, पण काळाच्या ओघात त्यांना पाऊस आणि उन्हापासून संरक्षण करणारी इलेक्ट्रिक कार हवी होती.
सन 2018 मध्ये त्याने इलेक्ट्रिक वाहने बनवण्याचा विचार सुरू केला. अँथनीने बनवलेल्या कारमध्ये 3 व्यक्ती सहज बसू शकतात. कारची बॉडी गॅरेजने बनवली होती, पण सर्व वायरिंग अँटोनी जॉननेच केले होते. अँथनीच्या घराच्या नावावरून या कारचे नाव ‘पुलकुडू’ ठेवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या कारला स्टीयरिंग, ब्रेक, क्लच, एक्सीलरेटर, हेडलाइट, फॉग लाइट इंडिकेटर आणि फ्रंट आणि बॅक वायपर्स देखील मिळतात. या इलेक्ट्रिक कारची रनिंग कॉस्टही खूप कमी आहे. फक्त 5 रुपये खर्चून 60 किलोमीटरपर्यंत धावू शकते. त्याचा कमाल वेग ताशी 25 किलोमीटर आहे.
दरम्यान, FADA च्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत दुचाकींच्या विक्रीत तिप्पटीहून अधिक वाढ झाली आहे. 2021-22 मध्ये एकूण इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 4,29,217 युनिट्सवर पोहोचली, ती आर्थिक वर्ष 2020-21 मधील 1,34,821 युनिट्सपेक्षा तिप्पट आहे.