इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चार महिलांना मुस्लीम धर्मात घेऊन त्यांना दहशतवादी संघटनेत सहभागी करून घेतले जाते, अशी कहाणी दाखविणारा ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. अश्यात केरळमध्ये एका हिंदू जोडप्याचा मशिदीत विवाह झाल्यामुळे एक अनोखी ‘केरळ स्टोरी’ पुढे आली आहे.
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला भाजपवगळता सर्वच पक्षांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. पण आता मशिदितील विवाह सोहळा ही केरळमधील धर्मनिरपेक्षता सिद्ध करणारी घटना असल्याचे म्हटले जात आहे. या सोहळ्याला देखील सोशल मिडियावर बरेच ट्रोल केले जात आहे. अॉस्कर विजेता संगीतकार ए आर रहमान याने या लग्नाचा व्हिडियो ट्वीट करून जोडप्याचे कौतुक केले आहे. ‘शाब्बास… मानवतेवर असेच विनाशर्त प्रेम असले पाहिजे’ असे कॅप्शनही त्याने दिले आहे.
रहमानच्या या पोस्टला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तर त्याचवेळी त्याला ट्रोलही केले जात आहे. नवरीच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यामुळे लग्नाचा खर्च करणे तिच्या कुटुंबाला शक्य नव्हते. अश्यात केरळमधील अल्लपुझा येथील एका मशिदीत या जोडप्याचे लग्न लावून देण्यात आले. सिनेमाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला अजेंडा राबवित असल्याचा आरोप करणाऱ्यांनी मशिदितील घटना डोक्यावर घेतली आहे. आता दोन्ही बाजुंनी जोरदार सोशल मिडिया वॉर सुरू झाला आहे. कारण ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा देखील आजच प्रदर्शित होत आहे.
मशिद कमिटीचे सहकार्य
ज्या हिंदू जोडप्याचे मशिदीत लग्न झाले त्यांचे नाव अंजू आणि शरत असे आहे. अंजूची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने तिच्या आईने अनेकांकडे मदत मागितली. पण त्याचा उपयोग झाला नाही. त्याचवेळी तिने मशीद कमिटीकडेही मदतीसाठी विनंती केली होती. कमिटीने तिला मदत केली आणि मशिदीतच लग्नासाठी मांडव सजवला आणि हिंदू पद्धतीनेच विवाह सोहळा पार पडला. अल्लपुझा येथील चेरुवल्ली जमात मशिदीत हा सोहळा पार पडला.
Bravo ?? love for humanity has to be unconditional and healing ❤️? https://t.co/X9xYVMxyiF
— A.R.Rahman (@arrahman) May 4, 2023
Kerala Hindu Couple Wedding Ceremony in Masjid Video