इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केरळ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या त्रिचुर येथील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. ठाकरे गटाचे नेते केरळ राज्य संपर्क नेते, खासदार अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते हे उदघाटन संपन्न झाले.
यावेळी भारतीय कामगार सेनेच्या कार्यालयाचे देखील उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे केरळ राज्यप्रमुख साजी तुरुतिकूननेल, सौभाग सुरेंद्र विभिनदास, अजयन चप्पथ, त्रिचुर जिल्हाप्रमुख मधू, भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव तसेच केरळ येथील स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.