नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरातील तोफखाना केंद्रीय विद्यालयात सोमवार (28 नोव्हेंबर) पासून भारत स्काऊट्स अँड गाईड्स अंतर्गत स्काऊट साठीचे पाच दिवसीय राज्य पुरस्कार परीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मुंबई सह अहमदाबाद- गुजरात विभागातील 36 शाळांचे एकूण 150 स्काऊट सहभागी होत आहेत.
सोमवारी सकाळी शिबिराच्या शुभारंभ कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून केंद्रीय विद्यालय मुंबई विभागाच्या आयुक्त श्रीमती सोना सेठ या उपस्थित राहणार आहेत. या शिबिरासाठी विद्यालयाने संपूर्ण तयारी केली असून स्काऊटचा नाशिक येथील 5 दिवसाचा मुक्काम संस्मरणीय राहील, अशी माहिती प्राचार्य देवेंद्र कुमार ओलावत यांनी दिली.
Kendriya Vidyalay Scout Guide Shibir Nashik