इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय कर्मचा-यांना दिवाळीआधीच मोठी भेट मिळाली आहे. या कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे महागाई भत्ता ५० टक्क्यांवरुन आता ५३ टक्के झाला आहे.
केंद्रीय कर्मचा-यांना ऑक्टोंबरच्या अखेरच्या काही दिवसात डीए वाढ जाहीर असली तरी त्याची अंमलबजावणी जुलै २०२४ पासूनच होईल. त्यामुळे कर्मचा-यांना जुलै ते ऑक्टोंबर या चार महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे.
केंद्राने हा निर्णय घेतल्यामुळे आता कर्मचा-यांचा पगारही वाढणार आहे. कर्मचा-यांचा पगार जर १ लाख रुपये असेल तर त्यांना ३ टक्के वाढीनुसार ३००० रुपये मिळेल.