नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा घरकामगार मोलकरीण संघटना असंघटित घरकामगारांना संघटित करीत आहे. राज्य सरकारच्या वतीने घरकामगार मंडळाच्या योजना घरकामगार मोलकरीण पर्यंत पोहचविण्याचे काम संघटना सातत्याने करत आहे. नाशिक जिल्ह्यातील घरकामगार मोलकरीण संघटना अन्याय विरोधात लढत आहे. तसेच घरकामगारांच्या न्याय हक्कांसाठी संघटीत होऊन संघर्ष करीत आहे.
३० जानेवारी २०२५ रोजी संघटनेचे ४ थे अधिवेशन नाशिक येथे पसा नाट्यगृह नाशिक येथे १ वाजता होत आहे. अधिवेशनाचे उद्घाटन विकास माळी सहाय्यक कामगार आयुक्त नाशिक विभाग करतील. प्रमूख अतिथी म्हणुन लोककवी प्रशांत मोरे, प्राचार्य प्रशांत पाटील, कॉ. महादेव खुडे तल्हा शेख, व्हि डी धनवटे, दत्तू तुपे राहतील. प्रमूख मार्गदर्शन करण्यासाठी कॉ. बबली रावत राष्ट्रिय सरचिटणीस घर कामगार मोलकरीण फेडरेशन आयटक (मुंबई) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष आयटक नेते कॉ. राजू देसले कार्याध्यक्ष नाशिक जिल्हा घर कामगार मोल करीन संघटना असतील.
तरी मोठ्या संख्येने घरकामगार मोलकरीणींनी उपस्थित राहावे घर कामगार योजना विषयी माहिती देण्यात येईल व आपला लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी निर्धार व्यक्त करावा. असे आवाहन कॉ. राजू देसले, कॉ. मिना आढाव, सुनीता कुलकर्णी, प्राजक्ता कापडणे, प्राजक्ता मगर, मीनाक्षी डोंगरे, मिना जाधव, छाया वराडे आदींनी केले आहे.