अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे,जिल्ह्याच्या बागलाण (सटाणा)तालुक्यातील पश्चिम पट्यात जोरदार पाऊस होतोय. आरम खोऱ्याला वरदान ठरलेल्या गोपाळ सागर( केळझर )धरण परिसरात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे साल्हेर किल्याच्या परिसरात निसर्गरम्य वातावरण तयार झाले आहे. साल्हेर किल्यावरून उगम पावलेल्या आरम नदीचे पाणी साळवण गावाजवळ असलेल्या चिनाळ धबधब्यावरून असे खळखळून वाहत आहे. या परिसरात गुजरात राज्यासह कसमादे पट्यातील निसर्गप्रेमीची खळखळून वाहणारे धबधबे,निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे.