निलेश गौतम, डांगसौंदाणे
बागलाणच्या पश्चिम भागातील ३८ खेड्यांसह सटाणा शहराला वरदान ठरलेले ५७२ दशलक्ष घनफुट क्षमतेचे केळझर (गोपाळसागर) धरण बुधवारी १३ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. धरणाच्या सांडव्यावरून ७५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू झाला आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने नदीपात्रात पाणी वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी धरण भरल्याने समाधान व्यक्त केले आहे. या धरणाला एकमेव डावा कालवा असून रब्बीत २ ते ३ हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होतो. तर आरम नदीपत्रालागत असलेल्या सर्वच गावांना धरण भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होते.