इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केदारनाथ धाम मंदिर पायी चालण्याच्या मार्गावर मोबाईल कनेक्टिव्हिटी प्रदान करणारा रिलायन्स जिओ पहिला ऑपरेटर बनला आहे. जिओ गौरीकुंड ते केदारनाथ धाम दरम्यान एकूण 5 टॉवर बसवणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार छोटी लिंचोली, लिंचोली आणि रुद्रपॉईंट येथे 3 टॉवर बसवण्यात आले आहेत. इतर दोन टॉवरही लवकरच कार्यान्वित होतील. जिओ फक्त 4G नेटवर्क कानेक्टिव्हिटी प्रदान करते, त्यामुळे साहजिकच संपूर्ण प्रवासाच्या मार्गावर 4G कव्हरेज उपलब्ध असेल. केदारनाथ मंदिर पादचारी मार्गावर कोणत्याही ऑपरेटरची मोबाईल कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत होता.
अजय अजेंद्र, बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष आणि सीईओ-बी. डी.सिंग यांनी रविवारी ही सेवा सुरू करण्याची औपचारिक घोषणा केली. चेअरमन अजय अजेंद्र यांनी केदारनाथ पादचारी मार्गावर जिओच्या मोबाईल कनेक्टिव्हिटीची सुरुवात ही एक दिलासादायक बातमी असल्याचे सांगितले. तसेच आता आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सोनप्रयागसारख्या महत्त्वाच्या थांब्यावर रिलायन्स जिओने पूर्ण क्षमतेचा टॉवर बसवला आहे. या टॉवरची वाहतूक वाढलेल्या स्थितीतही नेटवर्कवरील अतिरिक्त भार सहन करण्याची क्षमता आहे आणि ते सामान्यपणे कार्य करते. चारधाम यात्रेवर नेटवर्क कव्हरेज वाढवण्यासाठी, जिओ द्वारे 10 अतिरिक्त उपाय देखील स्थापित केले जात आहेत. जेणेकरून स्थानिक लोक आणि इतर राज्यातून येणाऱ्या यात्रेकरूंना नेटवर्कशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
कोविडमुळे दोन वर्षांनंतर सुरू झालेल्या चारधाम यात्रेत यंदा देवभूमी उत्तराखंडमध्ये विक्रमी प्रवासी येत आहेत. प्रशासन प्रवाशांना हाताळण्यात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत प्रवासी मार्गांवर विस्तृत 4G नेटवर्क उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे. रिलायन्स जिओ हे उत्तराखंडमधील एकमेव नेटवर्क आहे जे चारही धामांसह श्री हेमकुंड साहिबमध्ये उपलब्ध आहे. मोबाईल नेटवर्क आणि फायबर केबलने चार धाम जोडणारा जिओ हा एकमेव ऑपरेटर आहे.