इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चारधाम यात्रेतील विविध प्रकारचे अपघात आणि दुर्घटनांची मालिका सध्या सुरूच आहे. केदारनाथ यात्रेतही अशीच एक घटना घडली आहे. केदारनाथ येथील हेलिपॅडवर लँडिंग करीत असताना एक खासगी हेलिकॉप्टर अचानक अनियंत्रित झाले. हेलिपॅडच्या ठिकाणी शेकडो यात्रेकरु हजर होते. त्यामुळे याठिकाणी एकच खळबळ उडाली. हा सर्व प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. दरम्यान, यावेळी कुठलीही दुखापत झालेली नाही. मात्र, या घटनेची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
बघा या घटनेचा थरारक व्हिडिओ
https://twitter.com/ANINewsUP/status/1533775618977849344?s=20&t=yPkW2a6vb7w8ExS4K1fKOg