मुंबई – कौन बनेगा करोडपती हा लोकप्रिय कार्यक्रमाचा यंदा १२ सिझन सुरु आहे. गेल्या ११ सीझनमध्ये केवळ मनोरंजनच नव्हे तर ज्ञानात भर पाडण्यासाठी मदत करते आहे. मंगळवारी (१३ ऑक्टोबर) कौन बनेगा करोडपती मालिकेचा भाग रंजक ठरला. कार्यक्रमाची सुरूवात पाटण्याच्या राज लक्ष्मी यांनी केली. हॉटसीटवर बसलेल्या राज लक्ष्मी यांनी १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. यानंतर राज लक्ष्मीने खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नंतर स्वप्नील नावाचा स्पर्धक हॉटसीटवर आला. कार्यक्रम व्यवस्थित सुरु होता, मात्र स्वप्नील यांना प्रश्न विचारणार इतक्यातच कम्युटर बंद झाला. हे पाहून स्वतः बिग बी देखील आश्चर्यचकीत झाले. केबीसीच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच कॉम्युटर बंद पडला. कम्प्युटर बंद झाल्याचे स्वतः अमिताभ यांनी सांगितले. मात्र, हा गोंधळ काही सेकंदासाठी होता, नंतर कॉम्युटर पूर्ववत सुरु झाले व खेळ पुढे सरकला.