भोपाळ – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये होस्ट अमिताभ बच्चन यांनी केलेली विनंती पोलीस मुख्यालयाने मान्य केली आहे. यामुळे दोन वेगळ्या शहरात नोकरी करणारे पती पत्नी आता एकाच शहरात आले आहेत.
त्याचं झालं असं की, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या भागात विवेक कुमार सहभागी झाले होते. त्यांनी २५ लाखही जिंकले. तेव्हाच गप्पा मारता मारता विवेक यांनी अमिताभ बच्चन यांना आपली व्यथा सांगितली. विवेक आणि त्यांच्या पत्नी प्रीती सिकरवार हे दोघेही सरकारी नोकरीत आहेत. मात्र, या दोघांचीही कामाची ठिकाणे वेगवेगळ्या शहरात आहेत, आणि यामध्ये तब्बल ४०० किमी.चे अंतर आहे. या कार्यक्रमादरम्यान प्रीती देखील सेटवर उपस्थित होत्या. या परिस्थितीमुळे आमच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होत असल्याचे विवेक आणि प्रीती या दोघांचेही म्हणणे होते. त्यावेळीच अमिताभ बच्चन यांनी अशा लोकांना एकाच जागी नोकरी देण्याचे अपील राज्य सरकारकडे केले होते. त्यांचे हे अपील मान्य करत आता प्रीती यांची बदली विवेक काम करत असलेल्या मंदसौर येथील नार्कोटिक्स विंगमध्ये करण्यात आली आहे. ही बदली तीन वर्षांसाठी असेल.