मुंबई – कौन बनेगा करोडपती १२ चा प्रत्येक एपिसोड प्रेक्षकासाठी खूपच मनोरंजक ठरत आहे. काही दर्शकांना खूप आशा वाटते की, एक दिवस त्यांचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. अनेक स्पर्धक या स्पर्धा मधून लोखों रूपये कमावत आहेत. यात प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एका स्पर्धकाची माफी मागितली.
केबीसीच्या एपिसोडमध्ये खूपच मजेदार गोष्ट घडली. मंगळवारी या शो मध्ये रेखा रानी नावाच्या कंटेस्टेंट या अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीट वर बसल्या होत्या. यावेळी एका प्रश्नांवर नेहमीसारखी एक व्हिडिओ क्लिप दर्शविली गेली होती आणि मोहब्बतें या चित्रपटाची होती. यावेळी बॉलीवुडचे सुपरस्टार शाहरुख खानचा विषय निघाला. ‘बिग बी’ यांनी मोहब्बतें या चित्रपटात शाहरुख खानचा खूप राग राग केला. यावर महानायक अमिताभ म्हणाले की, मी शाहरुखवर रागावलो नाही तर त्यानेच माझा राग केला. त्यावेळी शाहरुखची फॅन असलेली रेखा रानी म्हणाली की, तुम्ही शाहरुखवर रागावला तेव्हा मला गुस्सा आला, कारण मी लहान होते आणि तेव्हा हा चित्रपट पाहून खूप रडले होते. यावर ‘बिग बी’ ने सांगितले, ‘अरे आता देखील या बद्दल मी तुमची माफी मागतो, त्यानंतर सर्वजण हसू लागले.