मुंबई – सर्वांनाच आकर्षित करणारे एकशिंगी गेंडे आणि जगप्रसिद्ध काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यटनाचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे. सर्वसाधारणपणे आपण स्वतःच वाहतूक आणि निवासाचे बुकींग करतो किंवा एजंटच्या माध्यमातून. मात्र, आता आणखी एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे.
देशात इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिंग कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) तर्फे वेळोवेळी पर्यटन स्थानकांची सहल करण्याची संधी देण्यात येते. एका पॅकेजअंतर्गत प्रवास, हॉटेल आणि जेवणाच्या खर्चाचा समावेश असतो. आयआरसीटीसीने नुकतेच आपल्या संकेतस्थळावर आसाममधील काझिरंगा राष्ट्रीय उद्यान आणि गुवाहाटीच्या पॅकेजची बुकिंग सुरू केली आहे. आसाममधील निसर्गसौंदर्य आणि वन्यजीवनाचा आनंद घ्यायची तुम्हाला इच्छा असेल तर हे पॅकेज उपयोगात येणार आहे. १६ हजार रुपयांच्या मर्यादित खर्चात ४ ते ५ दिवस आसामची सहल करता येणार आहे. आयआरसीटीच्या या पॅकेजबद्दल आणखी माहिती जाणून घेऊयात.
पहिला दिवस
या पॅकेजअंतर्गत तुम्हाला सर्वप्रथम आसाममधील गुवाहाटी विमानतळ किंवा रेल्वेस्थानकावर पोहोचावे लागेल. येथून आयआरसीटीसीचे पॅकेज सुरू होईल. सर्वात प्रथम तुम्ही गुवाहाटीपासून २५० किलोमीटर लांब असलेल्या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात पोहोचताल. तेथे पोहोचल्यानंतर आयआरसीटीसीकडून हॉटेलमध्ये चेक इन करण्यात येईल. रात्रीचे जेवण झाल्यानंतर रात्र काझिरंगामध्ये घालवावी लागेल.
दुसरा दिवस
प्रवासाच्या दुसर्या दिवशी सर्वप्रथम अर्ली मॉर्निंग एलिफंट सफारी (आपल्या खर्चावर) करू शकता येईल. त्यानंतर हॉटेलमध्ये नाश्ता मिळेल. नंतर जीप सफारीसाठी (आपल्या खर्चावर) जाऊ शकतो. सायंकाळी परत येऊन इतर काही कार्य करू शकता. रात्रीचे जेवण आणि मुक्काम काझिरंगामध्ये असेल.
तिसरा दिवस
सकाळी नाश्ता करून हॉटेरमधून चेकआउट करावे. तेथून गुवाहाटीला यावे. तेथे हॉटेलमध्ये चेक इन करावे. सायंकाळी तेथील स्थानिक बाजारात खरेदी करण्याची संधी मिळेल. त्याशिवाय रिव्हर क्रूझ (आपल्या खर्चावर) चा आनंद घेता येईल. रात्रीचे जेवण आणि मुक्काम गुवाहाटीमध्ये असेल.
चौथा दिवस
सकाळी हॉटेलमध्ये नाश्ता करून पूर्ण दिवस गुवाहाटीमध्ये फिरू शकता. त्यामध्ये कामाख्या मंदिर, नवग्रह मंदिर, उमानंद मंदिर आणि श्रीमंत संकरदेव कलाक्षेत्र या स्थळांचा समावेश आहे. सायंकाळी ब्रह्मपुत्रा नदीच्या किनारी फिरण्याचा आनंद घेऊ शकता.
पाचवा दिवस
सकाळी नाश्ता केल्यानंतर हॉटेलमधून चेक आउट करावे आणि गुवाहाटी रेल्वेस्थानक किंवा विमानतळाकडे प्रस्थान करावे. अशा प्रकारे पाचव्या दिवशी ही सहल तुम्हाला अनेक आठवणी देऊन जाईल.
या सहलीसंदर्भात अधिक माहिती आयआरसीटीसीच्या https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=EGH034 संकेतस्थळावर मिळेल. सहलीच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यास त्याबाबत पर्यटकांना माहिती दिली जाते. यावर सर्व अटी-शर्तींचा उल्लेख असेल.