मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे गटासोबत पिपल्स रिपब्लिकन पार्टीने युती केली आहे. पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर शिंदे आणि कवाडे यांनी एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली.
प्रा. कवाडे यांनी आज एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करुन शिंदे गटासोबत युती करीत असल्याचे म्हटले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शिव, शाहू, फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सम्यक परिवर्तनाचा विचार हा आमच्या युतीचा वैचारिक आधार आहे. महाराष्ट्राला विकासगामी करण्यासाठी व राज्यातील सर्व समाज समूहांच्या हक्कासाठी शिंदे आणि त्यांचा पक्ष कटिबद्ध आहे. थोर महामानवांच्या विचारावर आमची आघाडी वाटचाल करेल. या युतीच्या माध्यमातून शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडे ४१ जागांची मागणी केल्याचेही कवाडे यांनी सांगितले आहे.
बघा, कवाडे आणि शिंदे यांची ही पत्रकार परिषद
नरिमन पॉईंट, मुंबई येथील 'बाळासाहेब भवन' येथे प्रसारमाध्यमांशी संवाद https://t.co/7MUm9tXWOo
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 4, 2023
Jogendra Kawade Join Hands With Shinde Group Politics