विशेष प्रतिनिधी, मुंबई
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘अनुपमा’त आपण लवकरच एक नवीन ट्विस्ट पाहणार आहोत. प्रमुख भूमिकेत असलेल्या अनुपमा आणि वनराज यांचे लग्न होऊन घटस्फोट झाला आहे. तरीही वनराज आणि काव्या या दोघांचे अफेअर आहे. आणि ते दोघे लग्न करणार आहेत. मात्र, ऐन लग्नाच्या क्षणीच वनराज गायब आहे आणि त्यामुळे काव्या चिंताग्रस्त. आता पुढे काय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. वनराज अचानक कसा गायब झाला? तो काव्याशी लग्न करणार की नाही, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
त्यातच या मालिकेत सध्या राखी म्हणजेच अनुपमाची विहीण, परितोषची सासू हिची एंट्री झाली आहे. आपल्या मुलीचे, किंजलचे लग्न या घरात करून देण्याबाबत ती साशंक आहे. याच राखीची सध्या मालिकेत एंट्री झाली आहे.
काव्याची घालमेल पाहून तिला आनंद होतो आहे. ती काव्याला सांगते की, वनराज हा क्रेझी बॉलसारखा आहे. त्याच्या भावना त्याच्या ताब्यात नाहीत. तो कधीही कुठेही झुकू शकतो. एका वेळी त्याला तू आणि अनुपमा अशा दोघीही हव्या आहात. यामुळे काव्याच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. तूर्तास तरी सगळे वनराज कुठे आहे, याचा विचार करत आहेत. आता मालिकेत पुढे काय होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
डायरेक्टर्स कट प्रॉडक्शनच्या अंतर्गत राजन शाही यांनी ‘अनुपमा’ ची निर्मिती केली आहे. १३ जुलै २०२० पासून ही सिरीयल सुरू झाली असून यात रुपाली गांगुली शीर्षक भूमिकेत आहे. तर सुधांशू पांडे वनराजच्या भूमिकेत. ही सध्या छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका असून या माध्यमातून रुपाली गांगुलीने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका नेहमीच नंबर वन असते.
स्टार प्लसवरील ‘आई कुठे काय करते’ या मराठी मालिकेचे हे हिंदी रुपांतरण आहे. एका बाईची घरातील भूमिका आणि तिला घरातून मिळणारी वागणूक याचे अत्यंत वास्तववादी चित्रण यात दिसते. या मालिकेचा विषय पाहूनच ती हिंदीत करण्याचा निर्णय राजन शाही यांनी घेतला.