विशेष प्रतिनिधी, मुंबई
छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या नोंदणीस सुरुवात झाली आहे. सोमवार, १० मे पासून या कार्यक्रमाचे होस्ट बिग बी अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. या प्रश्नांची योग्य उत्तरे देणारी व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होऊ शकते.
मंगळवारी याअंतर्गत दुसरा प्रश्न विचारण्यात आला असून बुधवारी रात्री ९ पूर्वी याचे उत्तर द्यायचे आहे. दुसरा प्रश्न आहे,
रशियाच्या पहिल्या कोविड १९ लसीचे नाव काय आहे?
A. औरा V
B. स्पुतनिक V
C. वोस्तोक 1
D. फोबोस
या प्रश्नाचे योग्य उत्तर एसएमएस किंवा सोनी लिव्ह ऍपच्या माध्यमातून द्यायचे आहे.
कसे द्याल उत्तर?
तुमच्या फोनमध्ये सोनी लिव्ह ऍप डाऊनलोड करा. त्यात तुमची व्यक्तिगत माहिती द्या.
तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून देखील उत्तर देऊ शकता. मेसेज बॉक्समध्ये जाऊन KBC (स्पेस) योग्य उत्तर (स्पेस) तुमचे वय (स्पेस) स्त्री की पुरूष हे टाईप करून 509093 वर मेसेज करा.
योग्य उत्तर देणाऱ्यांपैकी पुढे जाणाऱ्या व्यक्तीची निवड संगणकामार्फत होणार असून त्यांना पुढच्या राऊंडसाठी बोलावण्यात येईल.