मुंबई – कोण बनेगा करोडपती? या खेळामध्ये सहभागी होऊन आपल्याला एक कोटी रुपये जिंकता यावेत असे अनेकांचे स्वप्न असते. परंतु हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, कारण त्यासाठी खूप जिद्दीने अभ्यास करावा लागतो, परंतु काहीजण या स्वप्नापर्यंत अगदी जवळ जाऊन त्यांचे स्वप्नपूर्ती होत नाही, असे दिसून येते. सोनी टीव्हीचा क्विझ रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती मध्ये सहभागी स्पर्धक सविता भाटी यांना एक कोटीच्या प्रश्नाचे अचूक उत्तर माहीत असूनही त्या करोडपती होऊ शकल्या नाहीत. त्यांना केवळ ५० लाख रुपये घेऊन खेळ सोडावा लागला. कारण त्यांना कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती.
सविता भाटी या रेल्वे हॉस्पिटल, जोधपूर, राजस्थान येथे अधीक्षक परिचारिका असून त्या रुग्णांची निस्वार्थपणे सेवा करतात. कोरोना साथीच्या काळात सविता या फ्रंट वर्कर (आघाडीच्या कामगार ) म्हणून काम करत होत्या. या शोमध्ये त्यांनी सांगितले की परिचारिका त्यांच्या रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या सुख दु:खाशी जोडल्या जातात. या गेममधून जिंकलेल्या पैशातून त्यांना मुलीसाठी मोबाईल फोन घ्यायचा असून गृहकर्ज फेडायचे आहे.
या खेळात सविता यांना अमिताभ यांनी १ कोटीचा प्रश्न विचारला की, पहिल्या महायुद्धा दरम्यान तुर्कीमध्ये कोणत्या लढाईत भारतीय सैन्याच्या १६ हजारपेक्षा जास्त सैनिकांनी मित्र राष्ट्रांशी शौर्याने लढा दिला? 1. गॅलिसिया, 2. अंकार, 3. तबसोर, 4. गल्लीपोली. या प्रश्नाचे योग्य उत्तर होते – (गल्लीपोली ) परंतु सविता यांना कोणताही धोका घ्यायचा नव्हता, म्हणून तिने ५० लाख रुपये घेऊन शो सोडला. मात्र खेळ सोडल्यानंतर सविता यांना कोणते उत्तर निवडले असते, असे विचारले तेव्हा त्यांनी गल्लीपोली हे नाव सांगितले. हे बरोबर उत्तर होते, पण त्याआधी सविता यांनी खेळ सोडला होता आणि त्यामुळे सविता ह्या शोच्या दुसऱ्या करोडपती झाल्या नाहीत