मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’चा 14वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. या सीझनमध्ये नवीन ट्विस्ट येणार असल्याची माहिती स्वतः अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. यापूर्वी या शोमध्ये बक्षीस रक्कम एक कोटी रुपये होती, ती वाढवण्यात आली आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या शोचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये स्पर्धकांचे 1 कोटी रुपये जिंकल्याबद्दल अभिनंदन केल्यानंतर ते विचारतात की तुम्हाला 7.5 कोटी रुपयांचा प्रश्न खेळायला आवडेल का? यानंतर अमिताभ स्पर्धकाला सांगतात की, जर तुम्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर तुम्ही 7.5 कोटी जिंकाल. पण तुमचे उत्तर चुकीचे असले तरी तुम्ही 75 लाख रुपये जिंकाल. त्यानंतर अमिताभ प्रेक्षकांकडे वळतात आणि घोषणा करतात, होय हे खरे आहे.
स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना केबीसीमध्ये आणखी एक पाऊल टाकले जात आहे, ते म्हणजे 75 लाख रुपये मिळणार आहेत, या नवीन नियमानंतर आता सहभागींना फायदा होणार आहे. या गेममध्ये पैसे जिंकणे त्यांच्यासाठी थोडे सोपे होणार आहे. शोच्या निर्मात्यांनी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पर्धकांना ही भेट दिली आहे.
एका रिपोर्ट्सनुसार, KBG-14चा सिझन दि. 14 ऑगस्टपासून सुरू होऊ शकतो, सोनी टीव्हीने याबाबत सध्या कोणतीही घोषणा केलेली नाही. स्पर्धकांसाठी शोची नोंदणी दि. 9 एप्रिल पासून सुरू झाली. दरवर्षीप्रमाणे या वेळीही हजारो नागरिकांनी आपले नशीब आजमावण्यासाठी नोंदणी केली आहे.
हा क्विझ शो नागरिकांचे ज्ञान दर्शवतो आणि वाढवितो, तसेच सहभागी म्हणून हॉट सीटवर बसलेल्या नागरिकांव्यतिरिक्त अनेक नागरिक त्यांच्या घरातही त्यांचे ज्ञान वाढवतात. हा शो सन 2000 पासून सुरु झाला होता. या सीझनचे 12 सीझन अमिताभ बच्चन यांनी होस्ट केले असून एक सीझन शाहरुख खानने अमिताभसोबत होस्ट केला आहे.
तसेच हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर प्रसारित होतो. त्याचप्रमाणे नागरिकांना हा शो खूप आवडतो, याचे कारण म्हणजे शोची चांगली संकल्पना आणि अमिताभ बच्चन यांचे होस्टिंग यामुळे शोची लोकप्रियता आणखी वाढते. अमिताभचे चाहते त्यांना पुन्हा केबीसी होस्ट करतानाची वाट पाहत आहेत.