सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्कादायक! कौमार्य चाचणीचा व्हिडिओ प्रथमच आला समोर (बघा व्हायरल व्हिडिओ)

by India Darpan
नोव्हेंबर 23, 2021 | 1:02 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Capture 20

नाशिक – कौमार्य चाचणीची कुप्रथा अद्यापही महाराष्ट्रात सुरूच असून या चाचणीचा व्हिडिओ पहिल्यांदाच समोर आला आहे विशेष म्हणजे, ज्या महिलेची ही चाचणी घेण्यात आली तिनेच हा व्हिडिओ तयार केला आहे. २०१८ मधील हा व्हिडिओ असून तो पुण्याचा असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हाती हा व्हिडिओ लागला आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कौमार्य चाचणी विरोधात लढत आहे. समितीच्या प्रयत्नाने ही पाचशे वर्षांची कुप्रथा समाजा समोर आणली गेली आहे. परंतु त्याबाबत पुरावा मिळत नव्हता. तो पहिल्यांदाच समितीच्या हाती लागलेला आहे.नाशिकमध्ये रविवारी एक विवाह पार पडला. त्यामध्ये कौमार्य चाचणी घेणार असल्याची तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानाकडे प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर पोलीसांच्या मदतीने ती कौमार्य चाचणी थांबविण्यात आली होती. अशी कौमार्य चाचणी त्यांच्या समाजात होत नसल्याचे जात पंचायतीच्या पंचांनी पोलीसांना लिहून दिले होते. मात्र या दाव्याला छेद देणारा व्हिडिओ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आला आहे. हा व्हिडिओ या विवाहाशी संबधित नसला तरी अशा प्रकारची कुप्रथा चालत असल्याची ग्वाही देणारा आहे. पुणे येथील हा व्हिडिओ असल्याचे समजते.

लग्नाच्या रात्री एका हाॅटेलच्या एका खोलीत नववधू व नववर दाखविण्यात आले आहे. पांढर्या शुभ्र वस्त्रावर झोपल्यानंतरचा त्यावर पडलेला रक्ताचा लाल डाग दिसत आहे. तसे वस्त्र नववधू आपल्या हाताने दाखवत आहे. हा व्हिडिओ 2018 चा असला तरी जात पंचायतचे क्रौर्य व अमानुष कुप्रथा समोर आणणारा आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामध्ये सरकारने या कुप्रथेची गंभीर दखल घेऊन ती बंद करण्यासाठी प्रयत्न करायला हवे, अशी मागणी जात पंचायत मूठमाती अभियानाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी व्यक्त केली आहे.

चांदगुडे यांनी म्हटले आहे की,  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या नऊ वर्षापासून जात पंचायतच्या मनमानी विरोधात लढत आहे.त्यात जात पंचायतींच्या अनेक क्रुर शिक्षा समाजा समोर आल्या आहे. कौमार्य चाचणी त्यातील एक प्रकार आहे. ती कुप्रथा बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.सरकारने याची दखल घेतली तरच अशा कुप्रथांना मूठमाती देणे शक्य होईल.

बघा हा व्हायरल व्हिडिओ

https://www.facebook.com/103446941470343/posts/375895630892138/

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसची आता ‘द-म-ओ’ची रणनीती!

Next Post

साधू-संतांच्या इशाऱ्यानंतर रामायण एक्सप्रेसमध्ये झाला हा मोठा बदल

India Darpan

Next Post
Capture 21

साधू-संतांच्या इशाऱ्यानंतर रामायण एक्सप्रेसमध्ये झाला हा मोठा बदल

ताज्या बातम्या

Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
IMG 20250621 WA0253 1

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 23, 2025
Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011