अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे सर्वत्र हिरवळ दिसण्यास सुरुवात झाली आहे. मनमाड परिसरात गेल्या काही दिवसांपासून सतत जोरदार पाऊस पडत असला तरी डोंगरांवरून वाहणारे धबधबे मात्र फारसे प्रवाहित झाले नव्हते. आज मनमाड लगत असलेल्या कातरवाडी जवळच्या कात्रा किल्ल्यावरील कपिल मुनी मंदिरा जवळील धबधबा प्रवाहित होऊन वाहू लागला. त्यामुळे या परिसरात किती पाऊस झाला असेल याचा अंदाज येऊ शकतो.