नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कळवण,सटाणा,मालेगाव आणि देवळा तालुक्याच्या कसमादे मराठा उत्कर्ष संस्थेच्या वतीने गेल्या वर्षी पासून चारही तालुक्यातील प्रशासकीय, वैद्यकीय, समाजसेवा, युवा, साहित्य, औद्योगिक, कला, शिक्षण, सहकार, कृषी, क्रीडा आणि विविध क्षेत्रात अभूतपूर्व कार्य करणाऱ्या व्यक्तींना “कसमादे गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येते. यंदाच्या वर्षी देखील कसमादे भागातील १४ व्यक्तींची कार्यकारिणीने आणि समन्वय समितीने निवड केलेल्या व्यक्तींचा गौरव शनिवार दिनांक १३ रोजी दुपारी ३ वाजता मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ‘रावसाहेब थोरात सभागृहात’ राज्याचे शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ.बी.जी.वाघ, कार्याध्यक्ष प्रा.गुलाबराव भामरे, सचिव डॉ.प्रशांत सूर्यवंशी यांनी दिली.
यांचा होणार गौरव :
लक्ष्मण किसन निकम (जीवनगौरव),नारायण परशराम कोर (विशेष योगदान पुरस्कार), डॉ.ए.के.पवार (वैद्यकीय), खंडू नानाजी मोरे (प्राथमिक शिक्षक), डॉ.जयवंत निम्बाजी ठाकरे (माध्यमिक शिक्षक), डॉ.ज्ञानेश्वर दादाजी पवार (उच्च व तंत्रशिक्षण ), डॉ.विश्राम मालजी निकम(समाजसेवा), केदा दावल भामरे (कृषी), भूषण कौतिक पगार (युवा ), उन्मेष शरद वाघ (प्रशासकीय), श्रीमती शकुंतला काशिनाथ भामरे (कर्तबगार महिला), डॉ.बाळासाहेब गुंजाळ (साहित्य), दुर्गा प्रमोद देवरे (क्रीडा), संजय भास्कर पवार (औद्योगिक व्यवसाय) याप्रसंगी जेष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
या सर्वांचा गौरव प्रसंगी कसमादे परिसरातील आणि शहर व जिल्ह्यातील हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन उपाध्यक्ष हिरामण सोनवणे, पंडित वाघ, रमेश खैरनार, रविंद्र निकम, सहसचिव विनीत पवार, प्रमोद अहिरराव, शिवराम हिरे, एन.डी.पवार, चंद्रशेखर सोनवणे, संजय अहिरराव, सुनील गांगुर्डे, प्रा.दिलीप अहिरे, डॉ.नंदू पवार,राजू देसले आदींनी केले आहे.