मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काश्मीरबद्दल असे म्हटले जाते, ‘ पृथ्वीवर स्वर्ग असेल तर तो इथे आहे, ‘ त्यामुळेच देशात राहणार्या प्रत्येक माणसाला काश्मीरच्या खोर्यातील सृष्टी एकदा तरी पहायचे असते. कदाचित आपणही अशी योजना करत असाल तर त्यासाठी ही योग्य वेळ आहे. कारण इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने जन्नत-ए-काश्मीर टूर पॅकेज आणले आहे. IRCTC ने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती शेअर केली आहे. 6 रात्री आणि 7 दिवसांच्या या पॅकेजमध्ये काय मिळेल आणि त्याचे दर किती आहेत जाणून घेऊ या…
IRCTC ने ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि ‘देखो अपना देश’ अंतर्गत आलिशान आणि परवडणारी टूर पॅकेजेस सादर केली आहेत. या पॅकेजमध्ये प्रति व्यक्ती खर्च 34,300 रुपये आहे. हे पॅकेज 6 रात्री आणि 7 दिवसांसाठी आहे. या पॅकेजअंतर्गत लखनऊ येथून प्रवास सुरू होणार आहे. ही यात्रा 18 जून पासून सुरू होणार असून 23 जून 2022 पर्यंत चालणार आहे. तसेच इंडिगो एअरलाइनने प्रवास करायला मिळणार आहे. IRCTC च्या या टूर पॅकेज अंतर्गत जम्मू, श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगामसह अनेक ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल.
खर्चाच्या संदर्भात, आराम वर्गातील तृतीय क्लाससाठी दरडोई खर्च 34,300 रुपये, द्वितीयसाठी 36,400 रुपये आणि प्रथमवर्गासाठी 48,650 रुपये आहे. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी बेडसह 32,100, तर बेडशिवाय त्याच वयाच्या मुलासाठी 28,100 रुपये आहे.
या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. तसेच www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=NLA41 किंवा 8287930911 वर संपर्क करून सर्व तपशील जाणून घेऊ शकता.